तुकडे-तुकडे गँगचं समर्थन करणार नाही, कंगनाचा दीपिकाला टोला
नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करुन चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने अभिनेत्री दीपिका पादुकोणला टोला लगावला आहे.

मुंबई : नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करुन चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने अभिनेत्री दीपिका पादुकोणला टोला लगावला आहे. 'छपाक' या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असताना अभिनेत्री दीपिका पादुकोण अचानक दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात दाखल झाली होती. जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर जालेल्या भ्याड हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. याचवेळी दीपिकाने आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. याच प्रकरणावरुन कंगनाने दीपिकावर टीका केली आहे.
कंगना म्हणाली की, मला वाटतं की ती (दीपिका) तिच्या सांवैधानिक अधिकाराचा वापर करत आहे. ती ते करु शकते. तिला माहीत आहे की, ती काय करतेय. तसेच ती काय करतेय यावर मी माझं मत मांडणं चुकीचं ठरेल. तिने काय करायला हवं, हे मी ठरवू शकत नाही. मी केवळ मला काय करायचं आहे ते ठरवू शकते.
कंगना दीपिकावर निशाणा साधत म्हणाली की, मी कधीही तुकडे-तुकडे गँगचं समर्थन करणार नाही. मला माहीत आहे की, काहीही झालं तरी या तुकडे तुकडे गँगचं समर्थन करणं योग्य ठरणार नाही. जो या देशाचे तुकडे करु इच्छितो अशा कोणत्याही व्यक्तिचं मी समर्थन करु शकत नाही. मी त्या लोकांना पाठिंबा देऊ शकत नाही. जे लोक आपल्या देशाचे जवान शहीद झाल्यानंतर सेलिब्रेशन करतात अशा लोकांचा मी विरोध करते.
06 जानेवारी रोजी जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (07 जानेवारी)अभिनेत्री दीपिका पादुकोण जेएनयूच्या बाहेर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाली. जेएनयूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची तिने विचारपूस केली. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होतं, त्या ठिकाणी दीपिकाने आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने जेएनयूमदील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाली होती. दीपिकाने आईशाचीसुद्दा भेट घेतली होती.
Deepika Padukone | दीपिका काहीही न बोलता परतली म्हणून आयशी घोष म्हणते... 'छपाक'मध्ये अॅसिड फेकणाऱ्याचा धर्म बदलला? काय आहे सत्य?महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
