Kangana Ranaut: अप्रत्यक्षरित्या कंगनानं 'आदिपुरुष'वर साधला निशाणा? पोस्टनं वेधलं लक्ष
कंगनानं सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या 'आदिपुरुष'(Adipurush) या चित्रपटावर निशाणा सधला आहे का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे.
Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर कंगना ही विविध विषयांवरील मतं मांडते. कंगनाच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतीच कंगनानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं अप्रत्यक्षरित्या 'आदिपुरुष'(Adipurush) या चित्रपटावर निशाणा सधला आहे का? असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे.
राम, सीता, हनुमान आणि लक्ष्मण यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कंगनानं त्या फोटोला 'देखो ऐ दीवानो, तुम ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो, बदनाम ना करो' या गाण्याचं बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आहे. कंगनानं या पोस्टमध्ये आदिपुरुष चित्रपटाचा उल्लेख नाही केला, पण या पोस्टच्या माध्यमातून तिनं 'आदिपुरुष' चित्रपटावर निशाणा साधला आहे, असा अंदाज अनेक नेटकरी लावत आहेत.
'आदिपुरुष' चित्रपटावर नेटकऱ्यांनी केली टीका
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नेटकरी आदिपुरुष या चित्रपटावर टीका करत आहेत. या चित्रपटामधील हनुमानाचा डायलॉग आणि प्रभासचा लूक या गोष्टींना नेटकरी ट्रोल करत आहेत. आदिपुरुष या चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFX ला देखील अनेकांनी ट्रोल केलं.
आदिपुरुष चित्रपटाची कास्ट
अभिनेता प्रभासनं आदिपुरुष या चित्रपटात प्रभू श्री राम यांची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री कृती सेनननं या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
View this post on Instagram
कंगनाचे आगामी चित्रपट
कंगना (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2, इमर्जन्सी आणि तेजस या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची तिनं निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: