Kangana Ranaut Sunny Leone : हवं तर सनी लिओनीला तर विचारा... उर्मिलाबाबतच्या वक्तव्यावर कंगनाने वादात सनीलाही खेचले
Kangana Ranaut Urmila Matondkar Sunny Leone : कंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री म्हटले होते. आता, कंगनाने आपल्या वक्तव्याच्या बचावासाठी सनी लिओनीलादेखील वादात खेचले आहे.
![Kangana Ranaut Sunny Leone : हवं तर सनी लिओनीला तर विचारा... उर्मिलाबाबतच्या वक्तव्यावर कंगनाने वादात सनीलाही खेचले Kangana Ranaut Defends Calling Urmila Matondkar on Soft Porn Actress remark saying Ask Sunny Leone Porn Stars Are Respected In India Kangana Ranaut Sunny Leone : हवं तर सनी लिओनीला तर विचारा... उर्मिलाबाबतच्या वक्तव्यावर कंगनाने वादात सनीलाही खेचले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/28/bf8c179116ced7c3b3b92ed011bf18fd1711616448143290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kangana Ranaut Urmila Matondkar : बॉलिवूड अभिनेत्री आणि आता भाजपची हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभेची (Mandi Lok Sabha) उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कंगना विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर कंगनाने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) विरोधात केलेले वक्तव्य व्हायरल झाले. कंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री म्हटले होते. आता, कंगनाने आपल्या वक्तव्याच्या बचावासाठी सनी लिओनीलादेखील (Sunny Leone) वादात खेचले आहे.
कंगना रणौत आपल्या बेधडक वक्तव्यामुळे अनेकदा ती वादाच्या सापडली आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या अकाउंटवरून पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत असा प्रकार कसा घडला याची माहिती दिली. त्यानंतर मात्र, नेटकऱ्यांनी आणि विरोधकांनी कंगनाच्या जुन्या वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. कंगनाने काही वर्षापूर्वी आपल्या एका वक्तव्यात उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न अभिनेत्री असल्याचे म्हटले होते. कंगनाचे हे वक्तव्य पुन्हा एकदा व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका होऊ लागली. 'टाईम्स नाऊ' या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत कंगनाने आपल्या वक्तव्यावर भाष्य केले.
कंगनाने काय म्हटले?
मंडी मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवणार असलेल्या कंगना रणौतने 'सॉफ्ट पॉर्न'च्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केले. कंगनाने पॉर्न स्टार म्हणणे लाजिरवाणी गोष्ट नसल्याचे म्हटले. यानंतर कंगनाने लगेचच यापूर्वी अॅडल्ट स्टार सनी लिओनीचे नाव घेतले. कंगनाने म्हटले की, सनी हे एक उदाहरण आहे जे दाखवते की पॉर्न स्टार्सना भारतात किती आदर दिला जातो. पॉर्न स्टार हा आक्षेपार्ह शब्द आहे का? असा उलट प्रश्न तिने केला. समाजात हा शब्द स्वीकार्ह नाही असेही तिने म्हटले. आपल्या देशात पॉर्न स्टार्सला प्रचंड सन्मान मिळतो, हवं तर सनी लिओनीला विचारा असेही तिने म्हटले. इतका सन्मान त्यांना इतर देशात मिळत नसल्याचे तिने म्हटले.
कंगना राणौतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर ट्विटरवर कंगनाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणाली होती. कंगनाची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उर्मिला मातोंडकरला उमेदवारी मिळाल्यानंतर कंगनाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्नस्टार आहे, तिला उमेदवारी मिळू शकते, तर मला का नाही, असं म्हटलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)