हिरोबरोबर शैय्यासोबत केल्यानंतर दोन मिनिटांचा रोल मिळतो, कंगनाचं वादग्रस्त ट्वीट
कंगना रनौतने याआधीही आपल्या ट्वीटमधून आरोप केला होता की, बॉलिवूडचे 99 टक्के लोक ड्रग्जचं सेवन करतात. तचेच रणवीर सिंह, रणबीर कपूर, विक्की कौशल आणि निर्देशक अयान मुखर्जी यांची नावं घेत त्यांना ब्लड टेस्ट करण्याचं आव्हानही दिलं होतं.
![हिरोबरोबर शैय्यासोबत केल्यानंतर दोन मिनिटांचा रोल मिळतो, कंगनाचं वादग्रस्त ट्वीट kangana ranaut big allegation on film industry bollywood says this industry gives role for 2 minutes after sleeping with the actors हिरोबरोबर शैय्यासोबत केल्यानंतर दोन मिनिटांचा रोल मिळतो, कंगनाचं वादग्रस्त ट्वीट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/17130816/kangana-ranaut.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने बुधवारी बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन प्रकरणी खासदार जया बच्चन यांनी दिलेल्या वक्तव्यावर उत्तर देत आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी संसदेत अभिनेते रवी किशन यांच्या वक्तव्याला उत्तर देत भाषण केलं. या भाषणावर कंगना रनौतने आपली प्रतिक्रिया देणारं ट्वीट केलं आहे.
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतने ट्वीटमध्ये लिहिलं की, 'कोणतं ताट दिलं आहे जया जी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने? एक ताट मिळालं होतं, ज्यामध्ये दोन मिनिटांची भूमिका आयटम नंबर आणि एक रोमॅन्टिक सीन मिळाला होता, तेसुद्धा हिरोबरोबर शैय्यासोबत केल्यानंतर. मी या इंडस्ट्रीला फेमिनिज्म शिकवलं, ताट देशभक्ती, स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवलं. हे माझं स्वतःचं ताट आहे जयाजी, तुमचं नाही.'
काय म्हणाले होते रवी किशन?
सोमवारी लोकसभेत बोलताना रवी किशन म्हणाले होते की, 'भारतीय चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जची सवय वाढत आहे. अनेक लोकांना अटकही करण्यात आली आहे. एनसीबी चांगलं काम करत आहे. मी केंद्र सरकारकडे मागणी करत आहे की, त्यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी, दोषींना लवकरात लवकर पकडा आणि त्यांना शिक्षा द्या. ज्यामुळे शेजारील देशांच्या कारस्थानांचा अंत होईल.'
पाहा व्हिडीओ : जया बच्चन-रवि किशन वादात आता कंगनाची उडी
रवी किशन यांच्या वक्तव्यावर जया बच्चन यांचा हल्लाबोल
पावसाळी अधिवेशाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरचे खासदार आणि अभिनेत रवी किशन यांनी संसदेत देश आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वाढता वापर आणि तस्करीचा मुद्दा मांडला होता. यावर आता खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली. जया बच्चन संसदेत बोलताना म्हणाल्या की, 'चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे अत्यंत लज्जास्पद आहे. मी कोणाचंही नाव घेत नाहीये. ते स्वतःही याच इंडस्ट्रीत काम करतात. जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है. ही चुकीची गोष्ट आहे. मला आता सांगावं लागत आहे की, इंडस्ट्रीला सरकारच्या सुरक्षेची आणि समर्थनाची गरज आहे.'
राज्यसभेच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार आणि अभिनेता रवी किशन यांचं नाव न घेता त्यांना खडे बोल सुनावले. तसेच इंडस्ट्रीला केंद्र सरकारच्या सुरक्षेची आणि समर्थनाची गरज आहे, असंही म्हणाल्या. या शाब्दिक युद्धात कंगना रनौतने रवी किशन यांच्या वक्तव्याचं समर्थन करत जया बच्चन यांना त्यांची मुलगी श्वेता नंदा आणि मुलगा अभिषेक बच्चन यांची नावं घेत प्रश्न विचारले होते.
'अभिषेक अचानक फासावर लटकल्याचं दिसून आलं तर?'; कंगना रनौतचा जया बच्चन यांच्यावर पलटवार
कंगना रनौतचं ट्वीट :
कंगना रनौत ट्वीटमध्ये म्हणाली की, 'जया जी, माझ्या जागी तुमची मुलगी श्वेताला जर किशोरवयात कोणी मारहाण केली असती, तिला ड्रग्स दिले असते आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती, तर तेव्हादेखील तुम्ही असंच म्हणाला असता का? तसंच अभिषेक सातत्याने छळ आणि गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटकल्याचं दिसून आलं तर? आमच्यासाठीही सहानुभूती दाखवा.'
कंगना रनौतने याआधीही आपल्या ट्वीटमधून आरोप केला होता की, बॉलिवूडचे 99 टक्के लोक ड्रग्जचं सेवन करतात. तचेच रणवीर सिंह, रणबीर कपूर, विक्की कौशल आणि निर्देशक अयान मुखर्जी यांची नावं घेत त्यांना ब्लड टेस्ट करण्याचं आव्हानही दिलं होतं.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून अटक करण्यात आली आहे. कंगना रनौतने या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी बॉलिवूडकरांवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूड विश्व ढवळून निघालं आहे. कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये 99 टक्के लोक ड्रग्ज घेतात. तसेच रियानेही एनसीबीला दिलेल्या जबाबात 25 बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, सुशांत ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानसह बॉलिवूडच्या 25 जणांची नावं हाती नसल्याची एनसीबीने दिली आहे. तसेच ड्रग्स खरेदी-विक्री करणाऱ्या 17 जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं'; नाव न घेता जया बच्चन यांचा रवी किशन यांच्यावर हल्लाबोल
- 'ही' नावं आली कुठून? रियाने कुणाचंही नाव न घेतल्याचा सरकारी सूत्रांचा दावा
- मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मिम्स शेअर करत कंगनाकडून मराठीत ट्वीट
- शिवसेना कार्यकर्त्यांकडून नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण, कंगना म्हणाली...
- खारच्या फ्लॅटवरुन कंगनाचं शरद पवारांकडे बोट, जितेंद्र आव्हाडांचं कंगनाला उत्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)