खारच्या फ्लॅटवरुन कंगनाचं शरद पवारांकडे बोट, जितेंद्र आव्हाडांचं कंगनाला उत्तर
कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन कंगना रनौतनं आता शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे. यासंदर्भात तिनं ट्वीट केलं असून त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला तिचं नाव न घेता उत्तर दिलं आहे.
मुंबई : कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन कंगना रनौतनं आता शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे. यासंदर्भात तिनं ट्वीट केलं असून त्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला तिचं नाव न घेता उत्तर दिलं आहे. फ्लॅटचं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौतला नोटीस बजावली होती. या नोटिसमध्ये असं म्हटलं होतं, फ्लॅटमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन केले गेलं आहे.
कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने कालपर्यंत मला कधीही नोटीस पाठविली नाही. खरं तर सर्व कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी मी स्वत: सर्व कागदपत्रं बीएमसीला दिली होती. बीएमसीसमोर किमान आपल्या धैर्याने उभे राहण्याची ताकत माझ्यात आहे. आता खोटं का बोलत आहेत? असा सवाल कंगनानं ट्वीटमधून केला आहे.
This was not just to me but to entire building and this is not my flat issue but a building issue which builder needs to deal with and this building belongs to Sharad Pawar we bought the flat from his partner so he is answerable for this not me..
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
हा फक्त माझाच नाही तर संपूर्ण इमारतीचा प्रश्न होता, केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नाही. ज्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने सामोरे जाण्याची गरज आहे. ही इमारत शरद पवारांची आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून खरेदी केला आहे. म्हणूनच ते यासाठी उत्तरदायी आहेत, असं तिनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाचं नाव न घेता टीका केली आहे. आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बदल- बीएमसी अभिनेत्री कंगना रनौतच्या घरी बीएमसीकडून कारवाई केली जाऊ शकते. बीएमसीने कंगनाच्या खार परिसरात असलेला फ्लॅट पाडण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौतला नोटीस बजावली होती. या नोटिसमध्ये असं म्हटलं होतं, फ्लॅटमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन केले गेलं आहे. कंगना रनौतने त्यावेळी दिवाणी न्यायालयात जाऊन कारवाईवर स्थगिती मिळवली होती. आता बीएमसीने कॅविएट दाखल केली आहे. स्थगिती आदेश रद्द करावा आणि आम्हाला चुकीच्या पद्धतीने केलेलं बांधकाम पाडण्याची परवानगी द्यावी, असं बीएमसीने म्हटलं आहे. खार परिसरातील डीबी ब्रिज नावाच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर कंगनाचं घर आहे. या घरात आठ ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. किचन आणि बाल्कनीतही चुकीच्या बांधकाम केल्याचं बोललं जात आहे. मुंबईत बेकायदेशीर बांधकाम नवीन नाहीत, अशा कारवाईने लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यास संधी; शरद पवारांचा घरचा आहेर बीएमसीने कंगनाच्या कार्यालयातील अवैध बांधकाम पाडलं काल मुंबईतील कंगना रनौतच्या 'मणिकर्णिका फिल्म्स' कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम बीएमसीने पाडलं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली. या प्रकरणी उद्या उच्च न्यायालय पुन्हा सुनावणी होणार आहे. कंगनाच्या कार्यालयात बेकायदा बांधकाम पाडण्यात घाई झाल्याबद्दल हायकोर्टाने बीएमसीना जाब विचारला आहे. आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, "आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा" असं कंगनाने म्हटलं. कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठ बदला घेतला आहे. आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा हे नेहमीच सारखं नसतं. मला वाटतं तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. कारण काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं हे मला आज कळलं. आज मी देशातील जनतेला वचन देतो की मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवणार आहे. आणि माझ्या देशवासियांना जागे करणार आहे. कारण जे माझ्याबाबतीत घडलं ते कुणासोबतही घडेल. उद्धव ठाकरे ही क्रुरता आणि दहशत माझ्यासोबत घडली हे चांगलं झालं. जय हिंद जय महाराष्ट्र. Majha Vishesh | कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? महत्त्वाच्या बातम्या :सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये.
पण जीला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली.#मानसिकरोगी#UdhavThackeray — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 9, 2020