एक्स्प्लोर
हृतिकच्या अॅक्शन थ्रिलर 'काबिल'चा ट्रेलर रिलीज

नवी दिल्लीः बॉलिवूड स्टार हृतिक रोशनच्या सस्पेंस थ्रिलर 'काबिल' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दोन दृष्टिहीन प्रेमीयुगुलींची प्रमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. दोघेही प्रेमातून एकमेकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्यांच्या कहाणीत अचानक खलनायकाची एंट्री होते. त्यानंतर सिनेमात खरा सस्पेंस असण्याची शक्यता आहे. https://twitter.com/iHrithik/status/790929460648407040 सिनेमातील डायलॉग, अॅक्शन आणि सस्पेंस जबरदस्त असल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे. या सिनेमात हृतिकसोबत अभिनेत्री यामी गौमत मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केलं आहे. पुढील वर्षी म्हणजे 26 जानेवारी 2017 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पाहा ट्रेलरः
आणखी वाचा























