Junaid Khan Debut Film Maharaj Release : आमिरच्या लेकाचं सिनेइंडस्ट्रीत पदार्पण; जुनैदचा 'महाराज' रिलीज, कुठे पाहाल चित्रपट?
Junaid Khan Debut Film Maharaj Release : जुनैदचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'च्या (Maharaj) रिलीजला गुजरात हायकोर्टाने दिलेली स्थगिती हटवली आहे
Junaid Khan Debut Film Maharaj Release : बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा लेक जुनैद खान (Junaid Khan) आता सिनेइंडस्ट्री गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. जुनैदचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'च्या (Maharaj) रिलीजला गुजरात हायकोर्टाने दिलेली स्थगिती हटवली आहे. त्यामुळे हा चित्रपट 21 जूनपासून रिलीज झाला आहे.
'महाराज' चित्रपटात झुनैद महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कोर्टात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली होती. या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला होता. काही दिवसांपूर्वी गुजरात हायकोर्टाने या चित्रपटाच्या रिलीजवर स्थगिती दिली होती.
'नेटफ्लिक्स'वर स्ट्रीमिंग सुरू
नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर 'महाराज' चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. 'महाराज'आता स्ट्रीम करत असल्याची माहिती या पोस्टरमधून देण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी केले आहे. जुनैद खान आणि जयदीप अहलावत प्रमुख भूमिकेत आहेत. त्याशिवाय शालिनी पांडे, शर्वरी वाघचीदेखील या चित्रपटात भूमिका आहे. हा चित्रपट 1862 मधील एका घटनेवर आधारीत गोष्ट आहे. पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्यावर आधारीत आहे. करसनदान मुलजी यांनी त्याकाळी महिलांचे अधिकार, सामाजिक सुधारणा यासाठी महत्त्वाचे काम केले होते. मुलजी यांच्याविरोधात खटलादेखील दाखल करण्यात आला होता.
View this post on Instagram
चित्रपटात जुनैदने पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका साकारली आहे. तर अहलावतने वल्लभाचार्य पंथाचे प्रमुख जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.
यशराज फिल्मसने काय म्हटले?
चित्रपटाच्या रिलीजवरून स्थगिती मागे घेतल्यानंतर यशराज फिल्मसने कोर्टाचे आभार मानले आहे. आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या समाजसुधारकांपैकी एक करसनदास मुळजी यांचा गौरव करणाऱ्या महाराज या चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी दिल्याबद्दल आम्ही आमच्या न्यायव्यवस्थेचे आभारी आहोत असे यशराज फिल्मसने म्हटले.
View this post on Instagram
करसनदास हे एक धर्माभिमानी वैष्णव होते. त्यांनी स्त्रियांच्या बाजूने भूमिका घेतली. 'महाराज' चित्रपट हा त्यांच्या कार्याला, कर्तुत्वाला सलाम करण्यासाठीची कलाकृती असल्याचे यशराज फिल्मसने म्हटले.