एक्स्प्लोर
'जॉली एलएलबी 2' चा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री हुमा कुरेशी स्टारर 'जॉली एलएलबी 2' या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमारने ट्विटरवर या सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे. शुक्रवारी सिनेमाचं पहिलं टीझर पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं होतं. यामध्ये अक्षय कुमारला स्कूटरवर दाखवण्यात आलं होतं. मात्र अक्षय कुमारचा चेहरा दिसत नसल्याने फर्स्ट लूकची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. https://twitter.com/akshaykumar/status/804739506452787200 'जॉली एलएलबी' या 2013 च्या सुपरहिट सिनेमा 'जॉली एलएलबी 2' सिक्वेल आहे. 'जॉली एलएलबी' या सिनेमात अर्शद वारसीने वकिलाची भूमिका साकारली होती तर सुभाष कपूर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. दरम्यान 'जॉली एलएलबी'मधील केवळ सौरभ शुक्ला 'जॉली एलएलबी 2' दिसणार आहे. हा सिनेमा 10 फेब्रुवारी 2017 मध्ये रिलीज होणार आहे. https://twitter.com/akshaykumar/status/804603587586179072
आणखी वाचा























