एक्स्प्लोर

जे खोटं आहे, ते खोटंच आहे,' तनुश्रीच्या आरोपांवर नानांचं उत्तर

दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता.

मुंबई : "जे खोटं आहे ते खोटंच आहे," असं सांगत अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेले आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत. 'हाऊसफुल 4' सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करुन नाना जैसलमेरहून मुंबईला परतले. त्यावेळी विमानतळावर परल्यानंतर मीडियाला नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं. आपल्या वाट्याचं चित्रीकरण पूर्ण करुन नाना पाटेकर गुरुवारी रात्रीच जैसलमेरहून जोधपूरला रवाना झाले होते. आज दुपारी 12.30 च्या सुमारास नाना जोधपूर विमानतळावर पोहोचले आणि जोधपूरहून 1.45 च्या सुमारास जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केलं. यानंतर नाना पाटेकर दुपारी 4 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बाहेर पडले. यावेळी विमानतळावर प्रतीक्षा करणाऱ्या मीडियाने त्यांना घेरलं. परंतु नानांनी या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला. मात्र पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर, ते म्हणाले की, "दहा वर्षांपूर्वीच मी याबाबत बोललो आहे. जे खोटं आहे, ते खोटंच आहे." तनुश्री दत्ताच्या आरोपांवर पत्रकार परिषद घेण्याच्या प्रश्नावर नाना एवढंच म्हणाले की, "लवकरच घेणार." दहा वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. त्यानतंर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं. तनुश्री दत्ताचा आरोप अनेक वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की, "नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना माहित आहे की, ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रींवर हातही उगारला आहे." 'हॉर्न ओके प्लीज' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला. संबंधित बातम्या तनुश्रीचा नानांवरील आरोप खोटा, मनसेचाही संबंध नाही : राकेश सारंग राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती : तनुश्री दत्ता तनुश्रीच्या नाना पाटेकरांवरील आरोपांवर बिग बींची प्रतिक्रिया तनुश्रीच्या गाडीवर हल्ला करणारा 'तो' व्यक्ती सापडला बीडमध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
Nagpur News : नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
Nagpur News : नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
नागपुरतील कोरडी मंदिरात देशातील सर्वात उंच 158 फूट हनुमान मूर्तीची निर्मिती; गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार लोकार्पण
Shoaib Akhtar On Ind vs Pak: 2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
2 संघच भारताचा पराभव करु शकतात...; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर शोएब अख्तर मनातलं सगळं बोलला!
Nagpur Crime : खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
खळबळजनक! नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला; नितीन शिमलेसह भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Maharashtra live blog updates: भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला, नगरसेविकेचा पती व भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
Maharashtra LIVE: भाजप नगरसेविकेच्या पतीवर सशस्त्र हल्ला, नगरसेविकेचा पती व भाजप कार्यकर्ता गंभीर जखमी
Embed widget