Jee Karda Trailer: मित्र-मैत्रीणींच्या ग्रुपची भन्नाट गोष्ट; तमन्ना भाटियाच्या 'जी करदा' चा ट्रेलर रिलीज
तमन्ना भाटियाच्या 'जी कारदा' (Jee Karda) या वेब सीरिज ट्रेलर रिलीज झाला आहे.
Jee Karda Trailer: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकताच तमन्ना भाटियाच्या 'जी कारदा' (Jee Karda) या वेब सीरिज ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सात मित्रांची कथा आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवण्यात आला आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर 15 जूनला रिलीज होणार आहे.
'जी कारदा' या वेब सीरिजची संपूर्ण कथा सात मित्रांभोवती फिरते. या वेब सीरिजमध्ये रोमान्स आणि मैत्रीसोबतच आयुष्यातील समस्याही दाखवण्यात आल्या आहेत.
'जी कारदा' ही वेब सीरिज 15 जूनला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होत आहे. तमन्ना भाटियाच्या (Tamanna Bhatia) व्यतिरिक्त या सीरिजमध्ये आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल आणि सायन बॅनर्जी या कलाकारांच्याही भूमिका आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन अरुणिमा शर्मा यांनी केले आहे. 'जी कारदा' वेब सीरिजचे 8 एपिसोड्स असणार आहेत. 'जी कारदा' या तमन्ना भाटियाच्या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तमन्ना भाटियानं सोशल मीडियावर 'जी कारदा' या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरला कमेंट करुन अनेकांनी तिच्या या आगामी वेब सीरिजसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा टीझर:
View this post on Instagram
बाहुबली या चित्रपटामुळे तमन्नाला विशेष लोकप्रियता मिळाली. तमन्नाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाचा बबली बाउंसर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तसेच तिचा प्लॅन ए प्लॅन बी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. या चित्रपटात तमन्नासोबत रितेश देशमुख हा देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता तमन्नाच्या 'जी कारदा' या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Tamanna Bhatia: तमन्ना भाटिया बिझनेसमनशी करणार लग्न? अभिनेत्रीनं व्हिडीओ शेअर करुन दिलं उत्तर