बिग बींसोबत, जया बच्चन रागारागात एअरपोर्टवर, बोट करुन स्टाफवर खेकसल्या अन् तशाच निघून गेल्या; नेटकरी म्हणतायत, "खडूस बुढिया"
अमिताभ बच्चन, जया बच्चन नुकत्याच विमानतळावर दिसल्या. मात्र त्यांच्या कणखर स्वभावामुळे त्या पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. जया बच्चन यांचा विमानतळावरून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jaya Bachchan Angry At Airport: ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) अनेकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतात, ते त्यांच्या परखड वक्तव्य आणि कणखर स्वभावामुळे. अनेकदा पापाराझी आणि त्यांच्यातील खटके सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. जया बच्चन यांचा राग, संताप अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. असाच आणखी एक जया बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मात्र, जया बच्चन एकट्या नाहीतर, त्यांचे पती बिग बी देखील सोबत होते. दरम्यान, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन एकत्र मुंबईला परतले त्यावेळी एअरपोर्टवरचा त्यांचा एकत्र व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जया बच्चन यांचा संताप पाहायला मिळत आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शुक्रवारी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन विमानतळावरून बाहेर पडताना दिसले. पापाराझींनी टिपलेल्या व्हिडीओमध्ये बिग बी फंकी ब्लॅक अँड व्हाइट जॅकेट घातलेले दिसत आहेत. निघताना त्यांनी अनिल अंबानींना मिठी मारली आणि गाडीत बसण्यापूर्वी सर्वांचे आभार मानले.
जया बच्चन यांचा संताप
पिंकव्हिलानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जया बच्चन प्रचंड रागावलेल्या दिसत आहेत. पण, त्या नेमकं कुणावर भडकल्या ते मात्र कळत नाहीये. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री जया बच्चन या विमानतळावरुन आपल्या गाडीच्या दिशेन जात आहेत. मध्येच त्या थांबतात आणि तेवढ्यात रागात (बुहुतेक त्यांच्या स्टाफवर) खेकसतात. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रागात काहीतरी ओरडतात आणि कुठेतरी बोट दाखवत रागानं कारच्या दिशेनं निघून जातात.
View this post on Instagram
मित्राच्या मुलाच्या लग्नात बच्चन कुटुंबिय एकत्र
काही दिवसांपूर्वी, बच्चन कुटुंबियांशी दीर्घकाळ संबंध असलेल्या मित्र राजेश यादव यांचा मुलगा रिकिनच्या लग्नात सगळे एकत्र दिसले होते. लग्नाच्या एका फोटोमध्ये बिग बी, जया बच्चन आणि अभिषेक बच्चन राजेश यादव यांच्या कुटुंबासोबत पोज देताना दिसले. पण फोटोमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या कुठेच नव्हती.
जया बच्चन यांचा चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जया बच्चन त्यांच्या राजकीय आणि अभिनय कारकिर्दीमुळे चर्चेत असतात. 2004 पासून समाजवादी पक्षाशी संबंधित असून राज्यसभेच्या खासदार आहेत. अनेकदा त्यांच्या राज्यसभेतील भाषणाच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापूर्वी त्या सर्वात शेवटी करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसल्या होत्या, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :