एक्स्प्लोर

Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...

Salim Javed The Angry Young Man : बॉलिवूड गाजवणारी ही जोडी फुटल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. ही जोडी का फुटली, याचे कारण समोर आले आहे.

Salim Javed The Angry Young Man :  बॉलिवूडमध्ये अभिनेता-अभिनेत्रीसोबत लेखक-पटकथाकारही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे सलीम-जावेद (Salim- Javed) या जोडगोळीने अधोरेखित केले. सलीम खान (Salim Khan) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) या जोडीने  एकत्रितपणे 24 चित्रपटांची कथा-पटकथा लिहिली. त्यातील  22 चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले. मात्र, बॉलिवूड गाजवणारी ही जोडी फुटल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. ही जोडी का फुटली, याचे कारण समोर आले आहे.

सलीम-जावेद जोडगोळी का फुटली?

नुकतीच प्राइम व्हिडीओवर रिलीज झालेली अँग्री यंग मॅन या डॉक्युमेंटरी सीरिजमध्ये सलीम-जावेद यांची जोडी फुटण्यामागील कारण समोर आले आहे. 
दिग्गज पटकथा लेखक सलीम यांनी सांगितले की, एकेदिवशी जावेद हे त्याच्याकडे आले आणि आता आपण पार्टनरशिपपासून मुव्ह ऑन करायले हवे असे सांगितले. तर, जावेद अख्तर यांनी सांगितले की, आमच्या कामातील थकवा दिसून येत होता. त्यामुळेच आमचा मार्ग वेगळा करण्याची वेळ आली असल्याची जाणीव झाली असल्याचे त्यांनी म्हटले. 

जावेद अख्तर म्हणाले, “जेव्हा तुम्ही एकत्र काम करण्यास सुरुवात करता, तेव्हा तुम्ही व्यवसायात नवीन असता, तुम्ही अनेक लोकांना ओळखत नाही. तुम्ही एकमेकांची साथ ठेवा. आम्ही 24 तासांपैकी 18 तास एकत्र होतो. मग मी नवीन मित्र बनवले आणि त्याने नवीन मित्र बनवले. आमच्या संध्याकाळच्या बैठका बंद पडल्या, हेही एक कारण होतं पण ते काही प्रमुख कारण नव्हतं. माझ्या मते मुख्य कारण म्हणजे हे आमच्या कारकिर्दीतील वसंत ऋतू ओसरत चालला होता आणि आमच्या कामात ते जाणवू लागले होते, यात काही शंका नाही. 

जोडी फुटण्याबाबत सलीम-जावेद यांच्याकडून वाच्यता नाही...

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही वेगळे झालो पण आम्ही ते अतिशय सभ्य पद्धतीने केले. सामान्यतः जेव्हा लोकांच्या वाटा वेगळ्या होतात, तेव्हा एकमेकांवर चिखलफेक करतात, निंदा नालस्ती करतात.  आम्ही कधीकधी असा युक्तिवाद केला की आम्ही परिपूर्ण नाही परंतु कोणीही नाही. मी माझी बाजू मांडेल आणि तो त्याची बाजू मांडेल. म्हणूनच आम्ही कधीच वेगळे होण्याबाबत भाष्य केले नाही. इतकंच नाही तर लोकांनी आम्हाला विचारले की, हा वेगळे होण्याचा निर्णय का घेतला? त्यावेळी आम्ही त्यावर भाष्य करणे टाळले. आम्हाला या निर्णयाबद्दल बोलणे आवडत नाही. आम्ही फक्त आमच्या चांगल्या वेळेबद्दल बोलतो.

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या सीरिजच्या दुसऱ्या भागात सलमान खानने सांगितले की, विभक्त होण्याच्या निर्णयानंतर सलीम खान घरी आले होता आणि त्याबद्दल ते 'अपसेट' दिसले. दुसरीकडे, जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी इराणीने सांगितले की, जावेदने तिला सलीम खानपासून वेगळे होण्याबद्दल प्रश्न विचारू नका असे बजावले होते.

सलीम-जावेद यांचे 22 चित्रपट ब्लॉकबस्टर

सलीम-जावेद यांनी 24 चित्रपटांसाठी काम केले. त्यातील 22 चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले.  यामध्ये शोले, डॉन, जंजीर आदी चित्रपटांचा समावेश आहे. मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी त्यांनी शेवटचे एकत्रितपणे काम केले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मनोजजी हिंमत असेल तर राहुल गांधींचा....'; भाजप नेत्यानं दिलेलं आव्हान मनोज जरांगे पाटील स्वीकारणार का?
'मनोजजी हिंमत असेल तर राहुल गांधींचा....'; भाजप नेत्यानं दिलेलं आव्हान मनोज जरांगे पाटील स्वीकारणार का?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
Kavita Raut : अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
Sharad Pawar : 'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ShivajiRao AdhalRao on Ajit pawar Melava : शिवाजीराव आढळराव पाटलांनी फिरवली अजित पवारांच्या आळंदी दौऱ्याकडे पाठTOP 50 : बातम्याचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaAjit Pawar Alandi Pune: दादा हे तुम्हीच करू शकतात, आळंदीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची अजितदादांकडे मागणीMaharashtra SuperFast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मनोजजी हिंमत असेल तर राहुल गांधींचा....'; भाजप नेत्यानं दिलेलं आव्हान मनोज जरांगे पाटील स्वीकारणार का?
'मनोजजी हिंमत असेल तर राहुल गांधींचा....'; भाजप नेत्यानं दिलेलं आव्हान मनोज जरांगे पाटील स्वीकारणार का?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
Kavita Raut : अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
अखेर सावरपाडा एक्स्प्रेसच्या संघर्षाला 11 वर्षांनी यश, कविता राऊतला मिळाली हक्काची सरकारी नोकरी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सरकारचा निर्णय
Sharad Pawar : 'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
'थोरल्या पवारांपासून हिंदू धर्माला धोका'; भाजपचा गंभीर आरोप, नाशिकमध्ये पुकारलं आंदोलन
Vanraj Andekar Murder Case: मोठी बातमी! वनराज आंदेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर, 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त, आणखी दोघांना अटक
मोठी बातमी! वनराज आंदेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर, 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त, आणखी दोघांना अटक
Dam water storage: राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
राज्यातील पावसाला ब्रेक! धरणसाठ्याची काय स्थिती? कोकण ते मराठवाडा पहा विभागनिहाय परिस्थिती
Nashik Traffic Route Change : नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नाशिककरांनो! पुढील पाच दिवस शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल, कुठले रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Embed widget