Javed Akhtar: उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीला जावेद अख्तर यांनी दिला पाठिंबा; बेशरम रंग गाण्याबाबत म्हणाले...
जावेद अख्तर यांच्यावर लिहिलेल्या 'जदुनामा' या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि चित्रपट निर्माते गुलजार यांच्या हस्ते झाले. यावेळी जावेद अख्तर यांनी वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे मत मांडले.
Javed Akhtar: प्रसिद्ध गीतकार, कवी आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यावर हिंदीत लिहिलेल्या आणि इंग्रजीत (दोन्ही) अनुवादित 'जदुनामा' या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (9 जानेवारी) संध्याकाळी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले. जावेद अख्तर यांच्यावर लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि चित्रपट निर्माते गुलजार यांच्या हस्ते झाले. यावेळी जावेद अख्तर यांनी वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे मत मांडले.
बेशरम रंग गाण्यावर दिली प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून बेशरम रंग हे गाणं चर्चेत आहेत. या गाण्यातील दीपिका पादुकोणनं परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगावर अनेकांनी आक्षेप घेतला. या गाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, 'चित्रपट सेन्सॉर करण्याचे काम सेन्सॉर बोर्डाने केले आहे आणि सेन्सॉर बोर्ड ही एक जबाबदार संस्था, केंद्रीय एजन्सी आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. आपण त्यांच्या प्रमाणपत्रावर विश्वास ठेवला पाहिजे.'
जेव्हा एबीपी न्यूजने जावेद अख्तर यांना विचारले की अशा प्रकारचे वाद कसे टाळता येतील तसेच फ्रिंज एलिमेंट्समुळे निर्माण होणारा वाद कसा थांबवता येईल. यावर जावेद अख्तर म्हणाले, 'यात कोणताही फ्रिंज एलिमेंट्स नाहीये, अशा गोष्टी आता मंत्री स्वतः करतात. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारशी बोलून मध्य प्रदेशसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची मागणी करावी. तुम्ही चित्रपट वेगळे पहा. याचा अर्थ असाच होतो की, ते सेन्सॉरच्या प्रमाणपत्रावर ते खूश नाहीत.'
जगतगुरू शंकराचार्यांनी धर्म सेन्सॉर बोर्डाच्या घोषणेबाबत एबीपी न्यूजनं विचारलेल्या प्रश्नाला जावेद अख्तर यांनी उत्तर दिलं, ते म्हणाले, 'मी त्यांच्या शब्दांचा विरोध करणार नाही. ते बनवायला हवे. जसे मध्य प्रदेशात सेन्सॉर बोर्ड असावे, तसेच धर्म सेन्सॉर बोर्ड देखील असावे. त्यात काय अडचण आहे?' जावेद अख्तर पुढे म्हणाले, "हिंदू धर्माचा मुद्दा असेल, तर इतर धर्मांसाठीही सेन्सॉर बोर्ड असायला हवे. आमच्याकडे चार-पाच प्रमुख धर्म आहेत. सगळ्यांचे सेन्सॉर बोर्ड करा. या बहाण्याने मौलवी लोक चित्रपट पाहतील'
जावेद अख्तर उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीला पाठिंबा दर्शवला
उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी बनवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या पुढाकाराचे जावेद अख्तर यांनी कौतुक केले. जावेद अख्तर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेश हे खूप मोठे ठिकाण आहे जिथे हिंदी भाषिक, उर्दू भाषिक लोक राहतात. तिथे फिल्मसिटी बनवली तर चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ मुंबईमधून फिल्मसिटी हटवणे, असा होत नाही, इथेच राहील. न्युयॉर्कमध्येही चित्रपट बनतात आणि कॅलिफोर्नियामध्येही चित्रपट बनतात. त्याचप्रमाणे उत्तर भारतात, विशेषत: उत्तर प्रदेशात चित्रपट बनू लागले, तर ते खूप चांगले आहे."
सेलिब्रिटींनी लावली हजेरी
हिंदीत लिहिलेल्या 'जदुनामा'च्या लेखिका अरविंद मंडलोई, इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या रक्षंदा जलील या 'जदुनामा' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होत्या. जावेद अख्यार यांची पत्नी शबाना आझमी, मुलगा फरहान अख्तर आणि सून अनुष्का दांडेकर आणि मुलगी झोया अख्तर यांनी देखील या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली . तब्बू, फरहा खान,नंदिता दास, उर्मिला मातोंडकर, सयामी खेर, दिव्या दत्ता, राजकुमार हीरानी, दिया मिर्जा इला अरुण, कंवलजीत, राहुल बोस, नीना गुप्ता, दिप्ती नवल हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: