![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Urfi Javed On Javed Akhtar : उर्फी जावेदने घेतली जावेद अख्तरांची भेट; फोटो शेअर करत म्हणाली,"अखेर माझ्या आजोबांना भेटले"
Urfi Javed : उर्फी जावेद आणि जावेद अख्तर यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
![Urfi Javed On Javed Akhtar : उर्फी जावेदने घेतली जावेद अख्तरांची भेट; फोटो शेअर करत म्हणाली, Urfi Javed poses with Javed Akhtar jokes finally met my grandfather Urfi Javed On Javed Akhtar : उर्फी जावेदने घेतली जावेद अख्तरांची भेट; फोटो शेअर करत म्हणाली,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/0df7c11db0d6dc7f044a4164e63759811673164599940254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Urfi Javed On Javed Akhtar : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत आहे. तिची स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरत असली तरी काही मंडळींनी मात्र तिच्या बोल्डनेसवर निशाणा साधला आहे. अशातच आता तिने जावेद अख्तरांची (Javed Akhtar) भेट घेतली आहे.
सोशल मीडियावर सध्या उर्फी जावेद (Urfi Javed) आणि जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. उर्फीने जावेद अख्तर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"अखेर माझ्या आजोबांना भेटले". उर्फीच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, एका फॅशन शोच्या निमित्ताने उर्फी जावेद दिल्लीत आली होती. या कार्यक्रमादरम्यान तिची जावेद अख्तर यांच्यासोबत भेट झाली. फोटो शेअर करत उर्फीने कॅप्शन लिहिले आहे,"अखेर आज माझ्या आजोबांना भेटले. ते खूप मोठे दिग्गज आहेत. खूप लोक सेल्फी घेण्यासाठी रांगेत उभे होते पण त्यांनी नाही म्हटलं नाही. सर्वांसोबत त्यांनी छान गप्पा मारल्या. ते खूप छान आहेत... मी खूप आनंदी आहे".
उर्फी जावेद सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बोल्ड कपड्यांमुळे तिच्यावर प्रचंड टीका होत आहे. चित्रा वाघ यांनी ट्वीट करत उर्फीवर निशाणा साधला त्यानंतर तिनेदेखील ट्वीट करत त्यांना सडेतोड उत्तर दिलं.
उर्फी जावेद कोण आहे?
उर्फी जावेद मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये झळकली, पण तिला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमुळे मिळाली. उर्फी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये झळकल्यानंतर ती घराघरात पोहोचली. तरुणाईमध्ये तिची लोकप्रियता वाढली. उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलची चर्चा होऊ लागली. सोशल मीडियावर उर्फी अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. उर्फी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर बनली आहे.
संबंधित बातम्या
Chitra Wagh - Urfi Javed Dispute: चित्रा वाघ-उर्फी जावेदचा वाद देवेंद्र फडणवीस यांनी मिटवावा, गलिच्छ राजकारण थांबवा : सुप्रिया सुळे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)