एक्स्प्लोर

'जय संतोषी माँ'चे निर्माते सतराम रोहरा यांचं निधन, यांच्या चित्रपटाने 'शोले'लाही दिली टक्कर

Producer Satram Rohra Passes Away : गायक, निर्माते आणि दिग्दर्शक सतराम रोहरा यांचं वयाच्या 85 व्या निधन झालं आहे.

Producer Satram Rohra Passed Away :  "जय संतोषी माँ" (Jai Santoshi Maa) हा चित्रपटाची निर्मिती करणारे सतराम रोहरा (Satram Rohra) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  सतराम रोहरा निर्मित 'जय संतोषी मा' च्या खणखणीत यशाने पौराणिक चित्रपटाला मुख्य प्रवाहात स्थान मिळाले. 'जय संतोषी माँ' (1975), भारतातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक, असे रेकॉर्ड होते जे आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही. सतराम रोहरा  यांनी 1973 मध्ये रॉकी मेरा जाम यासारख्या व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात संजीव कुमार मुख्य अभिनेते होते. त्यांनी नवा साहब, जय काली आणि घर की लाज या चित्रपटाची निर्मिती केली.

'जय संतोषी माँ' चित्रपट केला प्रोड्युस 

16 जून 1939 रोजी सिंध (आता पाकिस्तानात) येथे सतराम रोहरा यांचा जन्म झाला होता. पण भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी रोहरा यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं. त्यानंतर त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी शेरा डाकू (1966) हा चित्रपट पहिल्यांदा प्रोड्युस केला होता. त्यानंतर आलेला  'रॉकी मेरा नाम' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.  सतराम रोहरा निर्मित आणि विजय शर्मा दिग्दर्शित 'जय संतोषी मां' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. सतराम रोहरा यांनी 'घर की लाज', 'करण', 'जय काली', 'नवाब साहिब' यासारखे चित्रपट प्रोड्युस केले. सतराम रोहरा हे 'झुलेलाल', 'हाल ता भाजी हालू', 'शाल ध्यार ना जमा', 'लाडली' सारखी गाणी गायणारे गायक होते. त्यांनी 'महाभारत' (1987) मध्ये गायक म्हणूनही काम केले आहे.

शोले चित्रपटासोबत टक्कर 

'जय संतोषी माँ' या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाने विक्रम रचला होता. 15 ऑगस्ट 1975 रोजी 'जय संतोषी मां' आणि शोले हे चित्रपट रिलिज झाले होते. 'जय संतोषी मां' या चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण शोले हा चित्रपटाला चार दिवसांनंतर प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. शोलेसारख्या चित्रपटाकडून तगडी टक्कर मिळाल्यानंतरही 'जय संतोषी मां' हा चित्रपट तिकिटखिडकीवर यशस्वी ठरला.  

एका चित्रपटगृहात 50 आठवडे चालला चित्रपट

जय संतोषी मां हा चित्रपट वांद्रे येथील एका चित्रपटगृहात 50 आठवडे चालला होता, त्यावेळी हा विक्रमच झाला होता. Sacnilk नुसार 'जय संतोषी मां' या चित्रपटाचे बजट 30 लाख रुपये इतके होते, त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10.50 कोटी रुपयांची कमाई केली होती.  'जय संतोषी मां' या चित्रपटाची बॉलिवूडमधील ऑलटाईम हीट चित्रपट म्हणून नोंद झाली.  'जय संतोषी मां' हा चित्रपट पाहायला प्रेक्षक जाताना चित्रपटगृहाबाहेर चप्पल-बूट काढून जात होते. चित्रपटाचे टायटल साँग लागल्यानंतर आजही अनेकजण हात जोडून उभे राहतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

R Madhavan Diet : ना जिम, ना वर्कआउट; आर माधवने 21 दिवसात कसं कमी केलं वजन, वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : तिकडे शरद पवार कोल्हापुरात, इकडे अजित पवारांची मोठी घोषणा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारणार
तिकडे शरद पवार कोल्हापुरात, इकडे अजित पवारांची मोठी घोषणा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारणार
धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं
धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं
पुतळा पार्कचा 'बार्शी पॅटर्न'; महापुरुषांचे पुतळे एकाच जागेत, आर.आर. पाटलांकडून विशेष मंजुरी
पुतळा पार्कचा 'बार्शी पॅटर्न'; महापुरुषांचे पुतळे एकाच जागेत, आर.आर. पाटलांकडून विशेष मंजुरी
बिबट्या पळाला, त्याच्यामागे गेंडाही पळाला; जानकरांचा कागलमध्ये जाऊन हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
बिबट्या पळाला, त्याच्यामागे गेंडाही पळाला; जानकरांचा कागलमध्ये जाऊन हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bishnoi Gang Special Report : सलमानच्या 'जानी दुश्मन'चे शत्रू कोण?Jaydeep Apte Special Report : आरोपींना राजाश्रय? विरोधकांचा सवालSamarjeet Ghatge Special Report : शरद पवारांची पश्चिम महाराष्ट्रात मोठी खेळी !Marathwada Farming Special Report : मराठवाड्यात 16 हजार 225 हेक्टर बागायती शेतीचं नुकसान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : तिकडे शरद पवार कोल्हापुरात, इकडे अजित पवारांची मोठी घोषणा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारणार
तिकडे शरद पवार कोल्हापुरात, इकडे अजित पवारांची मोठी घोषणा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारणार
धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं
धक्कादायक! पुण्यात 8 दिवसांपूर्वी मुलाची आत्महत्या, आई-वडिलांनीही संपवले जीवन; अख्ख कुटुंब संपलं
पुतळा पार्कचा 'बार्शी पॅटर्न'; महापुरुषांचे पुतळे एकाच जागेत, आर.आर. पाटलांकडून विशेष मंजुरी
पुतळा पार्कचा 'बार्शी पॅटर्न'; महापुरुषांचे पुतळे एकाच जागेत, आर.आर. पाटलांकडून विशेष मंजुरी
बिबट्या पळाला, त्याच्यामागे गेंडाही पळाला; जानकरांचा कागलमध्ये जाऊन हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
बिबट्या पळाला, त्याच्यामागे गेंडाही पळाला; जानकरांचा कागलमध्ये जाऊन हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
आजही गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो; बाप्पांच्या आगमनापूर्वीच प्रणिती शिंदेंची खंत, महिलांना आवाहन
आजही गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो; बाप्पांच्या आगमनापूर्वीच प्रणिती शिंदेंची खंत, महिलांना आवाहन
गणेशोत्सवात  7, 12 अन् 17 सप्टेंबरला मद्यविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर, अन्यथा कारवाई
गणेशोत्सवात 7, 12 अन् 17 सप्टेंबरला मद्यविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांची ऑर्डर, अन्यथा कारवाई
मोठी बातमी! वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून उचललं
मोठी बातमी! वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून उचललं
Health: रक्तातली शुगर 'एवढी' झाली तर चिंतेचं कारण, ही लक्षणं दिसताच व्हा सावधान
रक्तातली शुगर 'एवढी' झाली तर चिंतेचं कारण, ही लक्षणं दिसताच व्हा सावधान
Embed widget