Ira Khan Nupur Shikhare Wedding : आयरा खानच्या हातावर रंगली नुपूर शिखरेच्या नावाची मेहंदी, आमिरच्या लेकीचा थाटच न्यारा; पाहा इनसाईड फोटो
Ira Khan Mehndi Ceremony : आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खानच्या हातावर नुपूर शिखरेच्या (Nupur Shikhare) नावाची मेहंदी रंगली आहे. त्यांच्या मेहंदीसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Ira Khan Nupur Shikhare Mehndi Wedding : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) पुन्हा एकदा नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नबंधनात अडकण्यास सज्ज आहेत. आयराच्या हातावर आता नुपूरच्या नावाची मेहंदी रंगली आहे. त्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयरा खान आणि नुपूर शिखरे उदयपूरमध्ये शाही थाटात लग्नबंधनात अडकणार आहेत. आयरा-नुपूरच्या या लग्नसोहळ्याची सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. आयरा आणि नुपूरने 3 जानेवारी 2024 रोजी मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केलं आहे. उद्यपूरमध्ये होणाऱ्या ग्रँड वेडिंगची सर्वांना आता उत्सुकता आहे.
आयराच्या हातावर सजली नुपूरच्या नावाची मेहंदी
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा लग्नसोहळा उदयपूरमध्ये होणार आहे. या ग्रँड वेडिंगला दोघांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी हजेरी लावणार आहेत. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयराच्या मेहंदी कार्यक्रमातील इनसाईड फोटो आता समोर आला आहे. एका फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तसेच चश्मादेखील लावला आहे. तर आयराच्या मागे नुपूर शिखरे उभा असलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोत दोन हात दिसत आहेत. या फोटोमध्ये 'आय आणि एन' (I & N) असं लिहिलेलं दिसत आहे.
Ira Khan Mehndi Pictures 😍 pic.twitter.com/u6JLgRhH99
— Geetu Katyal (@KatyalGeetu) January 8, 2024
लेकीच्या लग्नात थिरकला आमिर खान
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नसोहळ्यात आमिर खान खूप आनंदी दिसत आहे. या लग्नसोहळ्यादरम्यान आमिर खान थिरकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमिर खानने राजस्थानी लोकगीतावर डान्स केला आहे.
View this post on Instagram
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यानंतर 3 जानेवारी 2024 रोजी त्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आता आयरा आणि नुपूर महाराष्ट्रीय पद्धतीने शाही थाटात लग्न करणार आहेत. आयरा आणि नुपूरची पहिली भेट जिम ट्रेनिंग दरम्यान झाली होती. ट्रेनिंग दरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या अनेक दिवसांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत होते.
संबंधित बातम्या