Indian 2 OTT Release : थिएटरनंतर 'या'ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार कमल हासन यांचा 'इंडियन 2'
Indian 2 OTT Release: 'इंडियन 2' हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? जाणून घेऊयात...
Indian 2 OTT Release: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) हे लवकरच 'इंडियन 2' (Indian 2) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. 'इंडियन 2' हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? जाणून घेऊयात...
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार 'इंडियन 2'? (Indian 2 OTT Release)
कमल हासन यांचा 'इंडियन 2' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाईल. नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, 'इंडियन 2 हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषेत रिलीज होणार आहे.'
View this post on Instagram
टीझरला मिळाली प्रेक्षकांची पसंती
काही दिवसांपूर्वी 'इंडियन 2' या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. या टीझरमध्ये कमल हासन यांचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चाहते आता चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
इंडियन-2 ची स्टार कास्ट
कमल हासनच्या इंडियन हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'इंडियन 2' या चित्रपटात नयनतारा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात रकुल प्रीत सिंह, प्रिया भवानी शंकर आणि सिद्धार्थ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अल्लीराजा आणि उदयनिधी स्टॅलिन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Kamal Haasan : कमल हासनच्या 'इंडियन 2'ची पहिली झलक समोर; 'या' भूमिकेत झळकणार सुपरस्टार