Kamal Haasan : कमल हासनच्या 'इंडियन 2'ची पहिली झलक समोर; 'या' भूमिकेत झळकणार सुपरस्टार
Indian 2 : कमल हासनच्या (Kamal Haasan) 'इंडियन 2' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.
Kamal Haasan Indian 2 Poster Out : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) गेल्या काही दिवसांपासून 'इंडियन 2' (Indian 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे. 'इंडियन 2'चं पोस्टर आऊट झालं आहे.
'इंडियन 2'ची रिलीज डेट जाहीर! (Indian 2 Release Date)
कमल हासन आणि शंकर यांचा 'इंडियन 2' हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 'इंडियन 2'च्या निर्मात्यांनी एक ट्वीट शेअर करत लिहिलं आहे,"इंडियन 2'साठी सज्ज व्हा..3 नोव्हेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित..'इंडियन 2'ची पहिली झलक समोर".
View this post on Instagram
'इंडियन 2'च्या पोस्टरमध्ये कमल हासन दिसत आहेत. कमल हासन यांचा 7 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'इंडियन 2' हा सिनेमा 3 नोव्हेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. कमल हासनचा 'इंडियन 2' हा सिनेमा 1996 मध्ये आलेल्या 'इंडियन' या सिनेमाचा सीक्वेल आहे. या सिनेमात ते स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातही भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना ते दिसतील.
तगडी स्टारकास्ट असलेला 'इंडियन 2'
'इंडियन 2' या सिनेमात कमल हासन यांच्यासह नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच रकुल प्रीत सिंह, प्रिया भवानी शंकर आणि सिद्धार्थही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. एस. शंकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'इंडियन 2'च्या ओटीटी राइट्सबद्दल जाणून घ्या...
कमल हासनचा 'विक्रम' (Vikram) हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. रेकॉर्डब्रेक कमाईसह या सिनेमातील कमल हासनच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. आता पुन्हा एकदा कमल हासन रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'इंडियन 2' या सिनेमाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने 200 कोटींमध्ये विकत घेतले आहेत. 'इंडियन 2' या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन आणि एस. शंकर या जोडीने अनेक वर्षांनी एकत्र काम केले आहे. या सिनेमासाठी शंकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.
संबंधित बातम्या