India Lockdown : आई स्मिता पाटीलच्या आठवणीत प्रतीक बब्बर भावूक, 'इंडिया लॉकडाउन'च्या माध्यमातून आईला वाहणार श्रद्धांजली
Prateik Babbar : प्रतीक बब्बर 'इंडिया लॉकडाउन' या सिनेमाच्या माध्यमातून त्याच्या आईला म्हणजेच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांना श्रद्धांजली वाहणार आहे.
Prateik Babbar On Smita Patil : हिंदी सिने-सृष्टीतील दिग्गज अभिनेते राज बच्चर यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Prateik Babbar) सध्या 'इंडिया लॉकडाउन' (India Lockdown) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून प्रतीक बब्बर त्याच्या आईला म्हणजेच दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांना श्रद्धांजली वाहणार आहे.
लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती 'इंडिया लॉकडाउन' या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात प्रतीक स्थलांतरित मजुराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान इंडिअन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत प्रतीक म्हणाला,"इंडिया लॉकडाउन' या सिनेमाचा अभ्यास करताना मला माझ्या आईची खूप मदत झाली. आईने अशापद्धतीच्या अनेक भूमिका साकारल्याने मी तिचे अनेक सिनेमे पाहिले. तिच्याकडून मला खूप गोष्टी शिकता आल्या".
View this post on Instagram
2 डिसेंबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
'इंडिया लॉकडाउन' हा सिनेमा येत्या 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. या सिनेमात प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, अहाना कुमार, प्रकाश बेलावेदी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात फूलमतीच्या भूमिकेत दिसणार आहे.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये 'इंडिया लॉकडाउन' या सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे. हा महोत्सव येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात पार पडणार आहे. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन' या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे.
संबंधित बातम्या