Gurmeet Choudhary Daughter : गुरमित-देबिनाच्या लाडक्या लेकीची पहिली झलक समोर; सोशल मीडियावर शेअर केला फोटो
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee : गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जीने लाडक्या लेकीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee Baby Pic : टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरीच्या घरी नुकतेच छोट्या पाहुणीचे आगमन झाले आहे. गुरमीत चौधरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता गुरमित-देबिनाने लाडक्या लेकीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
गुरमित-देबिनाच्या मुलीचे नाव 'लियाना' असे आहे. नुकतीच गुरमित-देबिनाने लाडक्या लेकीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोत लियाना खूपच गोंडस दिसत आहे. गुरमित-देबिनाने शेअर केलेल्या लियानाच्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी कमेंट्स करत आहेत. परी, गोंडस अशा अनेक कमेंट्स चाहते करत आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर 'लियाना'चा फोटो व्हायरल
मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज लियानाच्या फोटोवर कमेंट्स करत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. देबिना आणि गुरमीतचे चाहते लियानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. गुरमित-देबिना लग्नाच्या 11 वर्षांनंतर आई-बाबा झाल्याने त्यांना खूप आनंद झाला होता.
लग्नाच्या 11 वर्षानंतर बनले पालक!
अभिनेत्री देबिना आणि अभिनेता गुरमीत 11 वर्षांनी आई-वडील झाले आहेत. आपल्या मुलीच्या जन्मामुळे दोघेही खूप आनंदी आहेत. सोशल मीडियावर चाहते दोघांनाही अभिनंदनाचे मेसेजेस पाठवत आहेत. देबिना यापूर्वी तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. देबिना बॅनर्जी आणि अभिनेता गुरमीत चौधरी नेहमीच त्यांच्या चाहत्यांशी कनेक्टेड असतात. देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी 2011मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांनी 9 फेब्रुवारी 2022 रोजी आपापल्या सोशल मीडिया हँडलद्वारे जाहीर केले होते की, ते आई-बाबा होणार आहेत.
संबंधित बातम्या