(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime Thrillers Web Series : क्राईम थ्रिलरपटाचे चाहते आहात? डिस्ने-हॉटस्टारवर पाहा खिळवून ठेवणाऱ्या 'या' 7 वेब सीरिज
Crime Thrillers Series On Disney + Hotstar: तुम्हालाही जर क्राईम-थ्रिलरपटाची आवड असेल तर डिस्ने-हॉटस्टारवर काही धमाकेदार सीरिज तुम्हाला पाहता येतील. दमदार कथानक, कलाकारांचा तगडा परफॉर्मन्स, कथेत येणारे अचानक ट्विस्ट यामुळे या वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.
Crime Thrillers Series On Disney + Hotstar: अनेक प्रेक्षकांना काही खास जॉनरचे चित्रपट, सीरिज पाहण्याची आवड असते. काहीजणांना कॉमेडी तर काहींना अॅक्शन मसालापट आवडतात. काहीजणांना सस्पेन्स, क्राईम-थ्रिलरपटही आवडतात. आपल्या आवडीच्या जॉनरचे चित्रपट, सीरिज हे खास प्रेक्षक चुकवत नाहीत. तुम्हालाही जर क्राईम-थ्रिलरपटाची आवड असेल तर डिस्ने-हॉटस्टारवर काही धमाकेदार सीरिज तुम्हाला पाहता येतील. दमदार कथानक, कलाकारांचा तगडा परफॉर्मन्स, कथेत येणारे अचानक ट्विस्ट यामुळे या वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. डिस्ने-हॉटस्टारवर या वेब सीरिज पाहता येतील.
स्पेशल ऑप्स 1.5: द हिम्मत स्टोरी
'स्पेशल ऑप्स 1.5: हिम्मत स्टोरी' ही प्रसिद्ध स्पाय थ्रिलर स्पेशल ऑप्सची स्पिन-ऑफ आहे. या सीरिजमध्ये गुप्तचर अधिकारी हिम्मत सिंग (के के मेनन) याची गोष्ट सांगते. या वेब सीरिजमध्ये हिम्मत सिंगच्या गुप्तचर संस्थेतील सुरुवातीच्या दिवसांची कथा सांगते. हिम्मत सिंगने पेललेली आव्हाने, त्याने केलेला त्याग आणि त्यांच्या करिअरला आकार देणारे प्रमुख घटना आदी गोष्टींवर वेब सीरिजची कथा बेतली आहे. या वेब सीरिजच्या आधीचा भाग 'स्पेशल ऑप्स' ही वेब सीरिजही पाहण्यासारखी आहे. गुप्तचर यंत्रणेच्या एका मोहिमेची कथा या वेब सीरिजमध्ये होती.
ताजा खबर
या थ्रिलर ड्रामाची कथा एक सफाई कर्मचारी वसंत गावडेच्या भोवती फिरते. अचानक एकेदिवशी त्याला एक मोबाईल फोन मिळतो. या मोबाईलमधून त्याला दुसऱ्या दिवशीच्या बातम्या,घडामोडी समजतात. वसंतला मिळालेल्या या स्पेशल पॉवरचा काय परिणाम होतो, त्याचे आयुष्य कसे बदलते, अचानक कोणत्या नाट्यमय घडामोडी आल्यात, यावर ही सीरिज बेतली आहे.
ऑनली मर्डर्स इन बिल्डिंग
या सीरिजमध्ये स्टीव्ह मार्टिन, मार्टिन शॉर्ट आणि सेलेना गोमेज सारख्या हॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. ही एक मर्डर मिस्ट्री सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये कॉमेडी आणि थ्रिलर पाहता येईल. तीन अनोळखी व्यक्ती न्यूयॉर्क मधील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. त्या इमारतीत एक हत्या होते. मग हे तिघे त्याचा तपास सुरू करतात. मग यात काय घडते, याचे चित्रण आहे.
क्रिमिनल जस्टिस
ब्रिटीश टीव्ही सीरियलपासून प्रेरित असलेली ही वेब सीरिज आहे. आदित्य शर्मा या कॅब चालकाला तरुणावर तरुणीची हत्या केल्याच्या आरोपात अटक केली जाते. त्यानंतर आदित्यचा आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा संघर्ष सुरू होतो. या वेब सीरिजमध्ये विक्रांत मेस्सी, जॅकी श्रॉफ, पंकज त्रिपाठी यांचा दमदार अभिनय आहे.
द फ्रिलान्सर
फ्रीलांसर सीरिजची सुरुवात दोन मुंबई पोलीस अधिकारी अविनाश कामथ (मोहित रैना) आणि इनायत खान (सुशांत सिंग) यांनी एका राजकारण्याशी झालेल्या भांडणानंतर त्यांची नोकरी गमावल्याने होते. भाडोत्री मारेकरी म्हणून अविनाशची कारकीर्द आणि इनायतची नोकरी शोधण्याची धडपड त्यांचे मार्ग वेगळे करतात. काही वर्षांनंतर, इनायतचा मृत्यू आणि तिची बेपत्ता मुलगी आलियाचे प्रकरण अविनाशचे लक्ष वेधून घेते. तो आलियाला शोधण्याची शपथ घेतो आणि धोकादायक मोहिमेवर एकटाच निघतो. या मोहिमेत नेमकं काय होते? दहशतवाद्यांचे मोड्युल्ड कसे काम करते, अविनाश यशस्वी होतो का, याचे चित्रण या वेब सीरिजमध्ये आहे.
सिव्हील सर्वेंट
सिव्हील सर्वेंट सीरिज ही लजार स्टॅनोजेविक आणि त्याच्या अंडरकव्हर टीमची गोष्ट आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य पार पाडताना आलेल्या आव्हानांवर या वेब सीरिजची कथा बेतली आहे. अॅक्शन क्राईम थ्रिलरपट हा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
डेअरडेव्हील
मार्व्हल कॉमिक कॅरेक्टर असलेल्या डेअरडेव्हील या नावाच्या पात्रावर ही वेब सीरिज आधारीत आहे. ही सीरिज मार्व्हल सिनेमॅटिक युनिर्व्हसचा हिस्सा आहे. दृष्टिहीन मॅट मर्डॉकचा प्रवास दाखवतो. सकाळी वकील आणि व्हिजिलेंट असतो.