एक्स्प्लोर

Ashok Saraf : 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाला लोक इतकं डोक्यावर घेतील असं वाटलं नव्हतं : अशोक सराफ

Ashok Saraf : 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाला आज 34 वर्ष पूर्ण झाल्याने अभिनेते अशोक सराफ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Ashok Saraf : 'अशी ही बनवाबनवी' (Ashi Hi Banwa Banwi) या इतिहास घडवणाऱ्या सिनेमाला आज 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. 23 सप्टेंबर 1988 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आज 34 वर्षांनंतरही या सिनेमातील कलाकार, गाणी, डायलॉग प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 'अशी ही बनवाबनवी'च्या आठवणींना उजाळा देताना अशोक सराफ (Ashok Saraf) म्हणाले आहेत,"सर्वांच्या मेहनतीमुळे एक चांगली कलाकृती बनली आहे". 

आठवणींना उजाळा देताना अशोक सराफ म्हणाले आहेत,"अशी ही बनवाबनवी' सारख्या सिनेमाचा भाग असल्याचा आनंद आहे. या सिनेमाला आज 34 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही फार आनंद देणारी गोष्ट आहे. हा सिनेमा आजही त्याच आवडीने पाहिला जात आहे. यासारखी दुसरी मोठी गोष्ट नाही. सिनेमातील डायलॉग सर्वांनाच पाठ झाले आहेत. याचं कारण म्हणजे वसंत सबनीसांचं लेखन. वसंत सबनीसांचं लेखन, डायलॉग, पटकथेला तोडच नाही".

अशोक सराफ पुढे म्हणाले आहेत,"अशी ही बनवाबनवी' या सिनेमात माझ्यासह, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरुण, सुप्रिया पिळगावकर, सुशांत रे, निवेदिता सराफ, अश्विनी भावे असे एकापेक्षा एक कलाकार आहेत. सिनेमातील प्रत्येक कलाकाराने भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. या सिनेमाच्या यशात सचिनचा मोलाचा वाटा आहे. सर्वांच्या मेहनतीमुळे एक चांगली कलाकृती बनली आहे". 

'अशी ही बनवाबनवी' या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हा सिनेमा लोकांना आवडेल? असा प्रश्न पडायचा. पण हा सिनेमा लोक एवढा डोक्यावर घेतील असं वाटलं नव्हतं. सिनेमातील डायलॉग आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत. तसेच यातील गाण्यांवर आजही लोक नाचतात. सिनेमा म्हटलं की टीमवर्क आलं. टीमवर्क हे फार क्वचित जुळून येतं. ते या सिनेमाच्या बाबतीत झालं आहे. असं मला निश्चितपणे वाटतं. 

'अशी ही बनवाबनवी' सिनेमात मी स्वत: काम केलेलं असून आजही सिनेमा टीव्हीवर लागला असेल तर मी आवडीने पाहतो. सिनेमा जिथे सुरू असेल तिथून मी शेवटपर्यंत पाहतो. या सिनेमातील सर्वच डायलॉग मला आवडतात. सचिन आणि लक्ष्मीकांतने बायकांची भूमिका असूनही विभत्सता न आणता केली. त्यामुळे कोणालाही ती पाहायला आवडते. माझं पात्रं गोष्ट घडवणारं आहे. त्यामुळे ते आणखी लोकप्रिय झालं आहे. सिनेमाचं शूटिंगदेखील लक्षात राहण्यासारखं आहे, असं प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा म्हणाले आहेत. 

'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा सिनेमा आहे. या सिनेमाला आजही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. आजही हा चित्रपट टीव्ही लागला तरी प्रेक्षक आवडीने पाहतात. सचिन पिळगावकरांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Ashok Saraf : अशोक सराफ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस; जाणून घ्या अशोक मामांबाबत 75 गोष्टी

Ashok Saraf : 'वक्ख्या विक्खी वुख्खू' ते 'हा माझा बायको पार्वती'; अशोक सराफ यांचे गाजलेले डायलॉग्स

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Joru ka Gulam Director: घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget