Honey Singh: अपहरण आणि मारहाण केल्याच्या आरोपांवर हनी सिंहची प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यावर करण्यात आलेले आरोप...'
हनी सिंह (Honey Singh) आणि त्याच्या टीमवर अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप एका व्यक्तीनं केला होता. या प्रकरणावर हनी सिंहने मौन सोडले आहे. नुकतीच हनी सिंहने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
![Honey Singh: अपहरण आणि मारहाण केल्याच्या आरोपांवर हनी सिंहची प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यावर करण्यात आलेले आरोप...' honey singh reacts to kidnapping and assault allegations share post on social media Honey Singh: अपहरण आणि मारहाण केल्याच्या आरोपांवर हनी सिंहची प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यावर करण्यात आलेले आरोप...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/53135e85526cb7fcc58f9d7262c677e91673863559614357_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Honey Singh: प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) त्याच्या गाण्यांनी नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. हनी सिंह हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विवेक रवी रामन नावाच्या कार्यक्रमाच्या आयोजकानं नुकताच हनी सिंह आणि त्याच्या टीमवर अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी विवेक रवी रामननं बुधवारी (19 एप्रिल) मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. आता या प्रकरणावर हनी सिंहने मौन सोडले आहे. नुकतीच हनी सिंहने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून हनी सिंहनं त्याची बाजू मांडली.
हनी सिंहची पोस्ट
हनी सिंहनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'माझ्याविरोधात केलेली तक्रार आणि आरोप हे खोटे आणि निराधार आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांशी माझा आणि माझ्या टीमचा काहीही संबंध नाही. मी मुंबईस्थित ट्राईब वाइब या नावाच्या कंपनीद्वारे परफॉर्म करायला गेलो होतो, ही एक नामांकित कंपनी आहे. या कार्यक्रमात मला जेवढा वेळ दिला होता तेवढाच मी परफॉर्म केलं. याशिवाय ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत, त्या केवळ माझी प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने पसरवल्या जात आहेत. माझी लिगल टीम या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल करण्याची तयार करत आहे.' हनी सिंहनं शेअर केलेल्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स करुन त्याला सपोर्ट केला आहे.
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय?
विवेक रवी रमण यांनी 15 एप्रिल रोजी BKC येथील MMRDA मैदानावर फेस्टिव्हिनातर्फे 'यो यो हनी सिंग 3.0' या म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. तक्रारदाराने बीकेसी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, कार्यक्रम रद्द केल्याने हनी सिंग आणि त्याच्या टीमनं नाराजी व्यक्त केली, ज्यांनी नंतर त्याचे अपहरण करण्यात आले आणि मारहाण करण्यात आली.
हनी सिंहच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
हनी सिंहने गायलेली 'हाय मेरा दिल', 'ब्राउन रंग', 'हाय हील्स', 'ब्रेकअप पार्टी', 'ब्रिंग मी बॅक', 'ब्लू आईज', 'पार्टी ऑन माय माइंड', 'लुंगी डान्स', 'पार्टी ऑल नाइट', 'सनी सनी', 'चार बॉटल वोडका', 'पार्टी विथ भूतनाथ', 'आता माझी सटकली', 'बर्थडे बॅश' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Honey Singh: घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय हनी सिंह? व्हायरल व्हिडीओनं चर्चेला उधाण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)