Dev Anand Birth Anniversary: "आज ते असते तर..." देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त हेमांगी कवीची खास पोस्ट
अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून हेमांगीनं तिचं देवा आनंद यांचे आवडते गाणे सांगितले आहे.
Dev Anand Birth Anniversary: अभिनेते देव आनंद (Dev Anand) यांची आज 100 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. नुकतीच अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) हिने देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून हेमांगीनं तिचं देवा आनंद यांचे आवडते गाणे सांगितले आहे.
हेमांगी कवीची पोस्ट
हेमांगी कवीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'काय योगायोग! या फोटोला कुठलं गाणं ठेवायचं विचार करत असताना हे गाणं सुचलं आणि आठवलं अरे आज तर 26 सप्टेंबर. देव आनंदचा birthday! माझा 26 ॲागस्ट आणि बरोबर एका महीन्याने देवचा म्हणून पक्कं लक्षात आहे! माझ्या मम्मी- पप्पांचा अत्यंत आवडता Hero! त्यांचे सिनेमे, त्यांची गाणी! हम दोनो, काला पानी आणि गाईड माझे personal favourites आणि त्यांच्यावर चित्रित झालेलं अभी ना जाओ छोड़ कर हे गाणं तर म्हणजे कहर आहे! पुढची 500 वर्ष तरी हे गाणं एवढंच टवटवीत राहील अगदी एव्हरग्रीन देव आनंद सारखं! आज ते असते तर 100 वर्षाचे झाले असते. Happy Birthday देव साहब!" हेमांगीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. हेमांगीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
देव आनंद यांचे चित्रपट
'जिद्दी' या चित्रपटामधून देव आनंद यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं . 'गाइड','हरे रामा हरे कृष्णा','देस परदेस', तेरे मेरे सपने, 'ज्वेल थीफ' आणि 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटांमधील देव आनंद यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. देव आनंद हे बॉलिवूडमधील हँडसम हिरो म्हणून ओळखले जात होते.
हेमांगीचे चित्रपट
'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हेमांगी तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. तमाशा Live या चित्रपटामध्ये देखील हेमांगीनं काम केलं. हेमांगीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
संबंधित बातम्या"
Dev Anand यांची आज 100 वी जयंती; हँडसम हिरोची एक अधुरी प्रेम कहाणी जाणून घ्या...