एक्स्प्लोर
दाऊदच्या बहिणीच्या भूमिकेत श्रद्धा कपूर, ‘हसीना पारकर’चं पोस्टर रिलीज
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या जीवनावर आधारित ‘हसीना पारकर’ सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. हसीनाच्या भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार आहे. पोस्टरवर श्रद्धा बुरख्यात दिसते.
‘अठ्ठासी केस दर्ज, पर कोर्ट में हाजरी सिर्फ एक बार’, असं वाक्य सिनेमाच्या पोस्टरवर आहे. हसीनाचा गुन्हेगारी जगतातील दबदबा या सिनेमातून उलगडणार की आणखी कोणत्या अंगाने सिनेमाचं कथानक फिरणार, हे अद्याप अधिकृतरित्या समोर आले नाही.
श्रद्धा कपूरने ट्वीट करुन सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं. अपूर्वा लखिया यांनी दिग्दर्शन केलेल्या या सिनेमाची निर्मिती नाहिद खान यांनी केली आहे.
अभिनेता सिद्धांत कपूर या सिनेमात दाऊदच्या भूमिकेत दिसणार असून, श्रद्धा कपूर दाऊदच्या बहिणीची म्हणजे हसीना पारकरची भूमिका साकारणार आहे. पहिल्यांदाच खऱ्या आयुष्यातील भाऊ-बहीण पडद्यावरही भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
6 जुलै 2014 रोजी हसीना पारकर हिचा मृत्यू झाला. हसीनाविरोधात 88 खटले सुरु होते. मात्र, तिच्या आयुष्यात ती केवळ एकदाच कोर्टात गेली.
https://twitter.com/ShraddhaKapoor/status/874162843569930240?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Faajtak.intoday.in%2Fstory%2Fhaseena-parkar-poster-release-shraddha-kapoor-1-934915.html
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement