(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Yami Gautam : यामी गौतमला व्हायचं होतं आयएएस अधिकारी; अभिनयाची गोडी लागली अन्...
Yami Gautam : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Happy Birthday Yami Gautam : सौंदर्य आणि उत्कृ्ष्ट अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी यामी गौतम (Yami Gautam) आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 नोव्हेंबर 1988 रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूरात यामीचा जन्म झाला. यामी अभ्यासात चांगली असल्याने आपण आयएएस अधिकारी व्हावं अशी तिची इच्छा होती. पण अभिनयाने खुनावल्याने तिची ही इच्छा मागे पडली.
वयाच्या 20 व्या वर्षी यामीने सिनेसृष्टीत करिअर करण्याचं ठरवलं. 'चांद के पार चलो' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने अभिनयक्षेत्रात पाऊल टाकलं. तिच्या पहिल्याच कामाला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने 'ये प्यार ना होगा कम' सारखा कार्यक्रम केला. या कार्यक्रमातील तिच्या कामाचं कौतुक झालं. यामीने 'मीठी चुरी नंबर वन', 'किचन चॅम्पियन' सारखे अनेक रिअॅलिटी शो केले आहेत.
यामीने 2009 साली कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने शूजित सरकारचा 'विकी डोनर' हा सिनेमा केला. या सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाच्या माध्यमातून तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. 'विकी डोनर'च्या यशानंतर तिने 'टोटल सैयप्पा', 'अॅक्शन जॅक्सन', 'बदलापूर', 'जुनूनियत', 'काबिल', 'सरकार 3', 'बत्ती गुल मीटर चालू', 'उरी' यांसारख्या अनेक सिनेमांत आपल्या अभिनायाची झलक दाखवली.
View this post on Instagram
यामी 4 जून 2021 रोजी सिनेदिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. यामीने आदित्यसोबत लग्न केल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यामी सध्या एक कलाकार म्हणून तिला शिकता येईल अशाच पात्रांची निवड करत आहे. आजवर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.
यामी मालिका आणि सिनेमांसह जाहिरातींमधूनदेखील खूप पैसे कमावते. 'फेअर अँड लव्हली', 'ग्लो अँड लव्हली', 'सॅमसंग मोबाइल' आणि 'वेनेसा केअर' सारख्या अनेक ब्रँडच्या जाहिराती यामीने केल्या आहेत. तिची एकूण संपत्ती 40 कोटी रुपयांच्या आसपास आहे. यामी गौतमचे स्वतःचे आलिशान घर आहे. तसेच तिच्याकडे अनेक लग्जरी गाड्यादेखील आहेत.
संबंधित बातम्या