(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Sonu Sood : चित्रपटात 'व्हिलन' पण गरीबांसाठी 'रियल हिरो'; सोनू सूदने जिंकले कोट्यवधी भारतीयांचे हृदय
Happy Birthday Sonu Sood : चित्रपटात व्हिलनची भूमिका बजावणारा सोनू सूद हा गरीबांना केलेल्या मदतीमुळे खऱ्या अर्थाने हिरो ठरला आहे.
Happy Birthday Sonu Sood : एखाद्या अभिनेत्याने चित्रपटात हिरोची भूमिका केली किंवा व्हिलनची भूमिका केली यावरुन त्याचे चारित्र्य ठरत नाही. त्याने खऱ्या आयुष्यात काय काम केलंय, काय योगदान दिलंय यावरुन त्याची ओळख निर्माण होते. ही गोष्ट बॉलिवूडचा दिलदार, दयावान आणि गरीबांचा मसिहा म्हणून ओळखला जाणाऱ्या सोनू सूदला चपखलपणे लागू होते. सोनू सूदचा आज वाढदिवस आहे.
सोनू सूदचा जन्म 30 जुलै 1973 साली पंजाबच्या मोगा या गावी झाला. इंजिनियरिंगच्या अभ्यासासाठी त्याने नागपूर गाठले आणि त्याच ठिकाणी अभिनय क्षेत्रात काम करण्याचा विचार त्याच्या मनात आला. त्यावेळी केवळ पाच हजार रुपये जवळ असताना त्याने मुंबई गाठली. सुरुवातीला त्याने तामिळ चित्रपट 'कल्लाझागर' मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर त्याने 'शहीद ए आझम' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
सोनू सूदने आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केलं असून कॉमेडी आणि व्हिलनची भूमिकाही केली आहे. परंतु चित्रपटातील हा 'व्हिलन' खऱ्या आयुष्यात 'हिरो' निघाला.
सोनू सूदने कोरोनाच्या काळात अखंडपणे लोकहिताचं काम केलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतरित कामगारांची अवस्था वाईट झाली असताना अनेक कामगार मुंबईहून शेकडो किमीचा पायी प्रवास करत त्यांच्या मूळ गावी जाण्यास निघाले. त्यावेळी सोनू सूदने त्यांच्यासाठी वाहतूकीची साधनं उपलब्ध करुन त्या गरीब कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवलं. त्याच्या जेवणाची व्यवस्था केली. तर दुसऱ्या लाटेत लोकांना आवश्यक असलेली औषधे उपलब्ध होत नव्हती ती त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम केल. या व्यतिरिक्त त्याने गरीब मुलांना शाळेचे साहित्य, त्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा मोबाईल अशा वस्तुंचेही वाटप केलं.
आजही सोनू सूद केवळ एका ट्वीटवरुन मागितलेल्या मदतीसाठीही धावून जातो. सोनू सूदने आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून अनेकांनी आपल्या मुलांचे नाव सोनू असं ठेवलंय तर अनेकांना आपल्या दुकानांचे, व्यवसायाचे नाव सोनू सून असं ठेवलंय. सोनू सूदने आपल्या कामातून कोट्यवधी भारतीयांचे हृदय जिंकलं आहे.
एका मुलाखतीत सोनू सूदने सांगितलं होतं की, त्याच्या आईच्या मृत्यूनंतर त्याने आपला वाढदिवस साजरा करायचं बंद केलं. या दिवशी तो केवळ आपल्या परिवारासोबत तसेच जवळच्या लोकांसोबत वेळ व्यतित करतो.
महत्वाच्या बातम्या :
- Deepika Kumar Olympic 2020 Exit: तिरंदाजीत दीपिका कुमारीचं आव्हान संपुष्टात, क्वार्टर फायनलमध्ये सलग तीन सेटमध्ये पराभव
- Tokyo Olympics 2020 : नवनीत कौरचा धमाका; भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात, स्पर्धेत आव्हान कायम
- CBSE Board 12th Result 2021 : सीबीएसईचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार; 'या' ठिकाणी पहा निकाल