एक्स्प्लोर

Happy Birthday Ali Fazal : ‘3 इडियट्स’मधील छोट्याशा भूमिकेने बदललं अली फजलचं नशीब; ‘मिर्झापूर’मुळे रातोरात झाला स्टार!

Ali Fazal Birthday: बॉलिवूड अभिनेता अली फजल (Ali Fazal) याने प्रतिभेच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्याने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

Ali Fazal Birthday: बॉलिवूड अभिनेता अली फजल (Ali Fazal) याने प्रतिभेच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्याने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. अलीने बॉलिवूड व्यतिरिक्त अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु, अलीला ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमधील ‘गुड्डू पंडित’च्या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी अली फजल त्याचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने आमिर खान, माधवन आणि शरमन जोशी अभिनित ‘3 इडियट्स’या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती. नुकतीच अलीने गर्लफ्रेंड ऋचा चढ्ढा हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

15 ऑक्टोबर 1986 रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे जन्मलेल्या अलीची गणना आज बॉलिवूडमधील टॉप कलाकारांमध्ये केली जाते. परंतु, त्याने इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात एका छोट्या साईड रोलमधून केली होती. डेहराडूनमध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या अलीने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

‘मिर्झापूर’ बनवले स्टार!

अली फजलने ‘3 इडियट्स’ चित्रपटात कॅमिओ केला होता. या चित्रपटात त्याने ‘जॉय लोबो’ची भूमिका साकारली होती. मात्र, ती भूमिका छोटीशी होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, मात्र त्याला फारशी ओळख मिळाली नाही. 2013 मध्ये, तो ‘फुक्रे’ या चित्रपटात झळकला. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. यानंतर त्याला ‘मिर्झापूर’ या सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या वेब सीरिजमधील त्यांच्या भूमिकेने त्याला रातोरात स्टार बनवले.

‘अशी’ मिळाली ‘3 इडियट्स’मध्ये संधी

अली फजलने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. पण, लवकरच त्याला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. एकदा तो एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करत असताना दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी अलीला '3 इडियट्स' चित्रपटासाठी साईन केले. या चित्रपटात अलीची भूमिका खूपच लहान होती, परंतु, यामुळे त्याचे नशीब पूर्णपणे बदलले. यानंतर अली फजलने कधीही मागे वळून पाहिले नाही.

हॉलिवूडमध्येही केलेय काम

अभिनेता अली फजलच्या हॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात 2015मध्ये ‘फास्ट अँड फ्युरियस 7’ या चित्रपटाने झाली. ‘फास्ट अँड फ्युरियस 7’ या चित्रपटामध्ये त्याने कॅमिओ केला होता. यानंतर, 2017च्या ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ चित्रपटाद्वारे, अलीला जुडी डेंचसारख्या दिग्गज अभिनेत्रीसोबत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याच्या कामाला खूप पसंती मिळाली होती.

हेही वाचा :

Richa-Ali Wedding: रिचा चड्ढाचा ब्रायडल लूक, तर अलीचा रॉयल लूक; शेअर केलेल्या फोटोने वेधलं लक्ष!

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget