(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनने कसं केलं ऐश्वर्या रायला प्रपोज? जाणून घ्या त्यांची फिल्मी लव्हस्टोरी...
Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आज त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Abhishek Bachchan Birthday : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) आज वाढदिवस आहे. अभिषेक त्याच्या सिनेसृष्टीतील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आज इतकी वर्षे झाली असली तरी त्यांची लव्हस्टोरी (Abhishek Bachchan) जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्याची पहिली भेट कधी झाली?
अभिषेक आणि ऐश्वर्याची (Abhishek And Aishwarya Rai) पहिली भेट 1999 साली 'ढाई अक्षर प्रेम के' (Dhai Akshar Prem Ke) या सिनेमाच्या फोटोशूटदरम्यान झाली. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्याची ओळख झाली.
View this post on Instagram
'ढाई अक्षर प्रेम के' या सिनेमात अभिषेक आणि ऐश्वर्याने पहिल्यांदा एकत्र काम केलं आहे. त्यानंतर ते 2003 साली 'कुछ ना कहो' या सिनेमात पुन्हा एकत्र झळकले. 2005 साली अभिषेक आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अभिषेक आणि ऐश्वर्याने आजवर अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे.
अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज कसं केलं?
अभिषेकने खूपच फिल्मी पद्धतीत ऐश्वर्याला प्रपोज केलं आहे. 2007 साली एका सिनेमाच्या शूटिंगसाठी अभिषेक आणि ऐश्वर्या न्यूयॉर्कला गेले होते. त्यावेळी अभिषेकने ऐश्वर्याला कसं प्रपोज करायचं याचा खूप विचार केला. अखेर न्यूयॉर्कमधील हॉटेलच्या बाल्कनीत त्याने फिल्मी पद्धतीत ऐश्वर्याला प्रपोज केलं. ऐश्वर्यालादेखील अभिषेक आवडत असल्याने तिने लगेचच होकार दिला. अखेर 20 एप्रिल 2007 साली अभिषेक आणि ऐश्वर्या लग्नबंधनात अडकले.
अभिषेकचा सिनेप्रवास...
अभिषेकने 2000 साली 'रिफ्यूजी' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्याने 'धूम', 'सरकार', 'कभी अलविदा ना कहना', 'गुरु', 'बंटी और बबली', 'दस', 'ब्लफमास्टर', 'धूम 2', 'दोस्ताना', 'पा', 'बोल बच्चन', 'धूम 3', 'हॅपी न्यू ईयर' आणि 'हाऊसफुल्ल 3' सारख्या लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. त्याचे काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाले आहेत. यात 'ब्रीद: इनटू द शैडोज', 'लूडो' आणि 'दसवी' सारख्या सिनेमांचा समावेश आहे. अभिषेकला आजवर तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेता असण्यासोबत अभिषेक निर्मातादेखील आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :