Golmaal 5 : 'सिंघम अगेन'नंतर आता 'गोलमाल 5' घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, रोहत शेट्टीने दिला महत्त्वाची अपडेट
Golmaal 5 : गोलमाल 5 विषयी मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे.
Golmaal 5 : रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगणची (Ajay Devgan) जोडी सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करतेय. त्याच्या 'सिंघम अगेन' (Singham Again) या चित्रपटाने जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे.पण आता पुन्हा एकदा ही जोडी नवा धमाका करण्याची तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. कारण सिंघमच्या तिसऱ्या भागानंतर आता गोलमाल सिनेमाच्याही पुढच्या भागाची चर्चा सुरु झाली.
वृत्तानुसार, अजय देवगण आणि रोहित शेट्टीनेच अजय देवगन आणि त्याचा पुढचा सिनेमा हा गोलमाल 5 असल्याची पुष्टी केली आहे. रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी पिंकविलाशी बोलताना सांगितले की, सध्या कॉप युनिव्हर्समध्ये कोणत्याही चित्रपटापूर्वी पुढचा चित्रपट गोलमाल असेल. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं दमदार मनोरंजन करण्यात येणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
गोलमालच्या सीरिजमधला पुढचा सिनेमाही येणार भेटीला
गोलमान सिनेमाच्या माध्यमातून कायम गंभीर भूमिका करणाऱ्या अजय देवगनला कॉमेडी भूमिका करण्याची संधी मिळाली. त्याच्या गोपाल या पात्राने प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. त्यानंतर गोलमालचे आतापर्यंत चार भाग आले आहेत. त्यातच आता पाचवा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. गोलमालच्या सीरिजमधील गोलमाल अगेन हा 2017 मध्ये आलेला शेवटचा सिनेमा होता. अजय देवगणच्या करिअरमधला हा पहिलाच चित्रपट आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली होती.
गोलमाल 5 तोडणार हे रेकॉर्ड्स?
हाऊसफुल 5 येईपर्यंत, गोलमाल अगेन हा सर्वाधिक कमाई करणारा विनोदी सिनेमा होता. पण तरीही हाऊसफुल्ल 5 या सिनेमानेच गोलमाल अगेनपेक्षा 28 लाख रुपये अधिक कमावले. पण गोलमाल 5 हा विक्रम मोडू शकेल अशी शक्यता वर्तवली जातेय. सध्या बॉक्स ऑफिसवर आलेला सिंघम अगेन 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे.अजय देवगणच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता अजय देवगण गोलमाल अगेनद्वारे त्याचा सर्वात मोठा हिट चित्रपट घेऊन येऊ शकतो.
गोलमाल 2006 मध्ये रिलीज झाल्यापासून या मालिकेतील प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जर हा चित्रपट हिट झाला तर अजय देवगण-रोहित शेट्टी यांच्याकडे दोन फ्रँचायझी असतील ज्यांच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ केला आहे.