एक्स्प्लोर

Gautami Patil : नाद करा पण गौतमीचा कुठं... वाद, गोंधळ, संघर्षमय आयुष्य; महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलबद्दल जाणून घ्या...

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटीलने आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

Gautami Patil : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच आपल्या नृत्यामुळे चर्चेत असते. 2022 मध्ये एका कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स स्टेप्स करत तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अश्लील अदांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. पण तरीही तिच्या प्रत्येक कार्यक्रमात वाद, गोंधळ होणं सुरुच राहिलं आहे. महाराष्ट्रात गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण ती नक्की आहे कोण? तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय? असे अनेक प्रश्न जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

...अशी झाली गौतमीच्या संघर्षाला सुरुवात

धुळ्यात जन्मलेल्या गौतमी पाटीलचा आज महाराष्ट्रात मोठा चाहतावर्ग आहे. गौतमीचा सांभाळ तिच्या आईने आणि आजोबांनी केला आहे.  तिचे वडील व्यसनी असून ते आईला मारहाण करत असे. त्यामुळे तिची आई वडिलांचं घर सोडून माहेरी राहायला आली होती. आपले वडील कोण आहेत? ते काय करतात हे लहानपणी गौतमीला  माहीत नव्हतं. 

गौतमीचा सांभाळ करण्यासोबत घर चालवण्याची जबाबदारीदेखील तिच्या आईने सांभाळली होती. पण एकदा आईचा अपघात झाला आणि हे चक्र थांबलं. त्यानंतर घराची जबाबदारी गौतमीकडे आली. गौतमीला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड नव्हती. अशातच पैसे कमावण्यासाठी तिने दहावीनंतर शिक्षण सोडलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने गौतमीच्या संघर्षाची सुरुवात झाली.

गौतमीने आठवीत असतानाचं पुणे गाठलं. पुण्यातील एका डान्स अकादमीमार्फत तिने नृत्य करायला सुरुवात केली. बॅक डान्सर म्हणून काम करायला तिने सुरुवात केली. पुढे या क्षेत्राची आवड निर्माण झाल्यानंतर तिने स्वत:चे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली. 

गौतमी पाटीलला एका कठीण प्रसंगाचाही सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. या प्रकरणावर तिने आवाजही उठवला. या सगळ्या गोष्टींवर मात करत ती पुन्हा एकदा मंच गाजवायला उभी राहिली.

सबसे कातील गौतमी पाटील... 

गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आपल्या नृत्याची झलक ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. 'सबसे कातील गौतमी पाटील' अशी तिची ओळख आहे. इंस्टाग्रामवर गौतमीचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. गौतमीचा 'घुंगरू' (Ghoogroo) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

संबंधित बातम्या

Gautami Patil: गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल; छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Torres Scam : दादरचं ऑफिस 25 लाखात मिळवून दिलं, कंपनीनं दहावी नापासला तौसिफला CEO केलं, टोरेसचे धक्कादायक कारनामे
टोरेस घोटाळ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 14 महागड्या कार जप्त; कंपनीच्या सीईओबद्दल धक्कादायक माहिती
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Death Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा स्वत:ला संपवण्याचा इशारा, ग्रामस्थही आक्रमकTop 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 630AM 13 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 13 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Torres Scam : दादरचं ऑफिस 25 लाखात मिळवून दिलं, कंपनीनं दहावी नापासला तौसिफला CEO केलं, टोरेसचे धक्कादायक कारनामे
टोरेस घोटाळ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 14 महागड्या कार जप्त; कंपनीच्या सीईओबद्दल धक्कादायक माहिती
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Embed widget