Gandhi Jayanti 2023 : 'गांधी' ते 'हे राम'; महात्मा गांधीजींच्या आयुष्यावर आधारित 'हे' सिनेमे देतील प्रत्येकाला प्रेरणा
Mahatma Gandhi Movies : महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमे आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
Mahatma Gandhi Jayanti 2023 : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचं मोलाचं योगदान आहे. आज देशभरात गांधी जयंती (Gandhi Jayanti 2023) साजरी केली जात आहे. अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. यात 'गांधी' (Gandhi) ते 'हे राम' (Hey Ram) पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे.
गांधी (Gandhi) : मोहनदास करमचंद गांधी यांच्या आयुष्यावर आधारित 'गांधी' हा सिनेमा 1982 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा त्यावेळी चांगलाच सुपरहिट ठरला होता. या सिनेमाला ऑस्कर पुरस्कारदेखील मिळाला. बेन किंग्सले यांनी या सिनेमात गांधींची भूमिका साकारली होती.
हे राम (Hey Ram) : 'हे राम' या सिनेमात बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी महात्मा गांधी यांची भूमिका साकारली होती. 2000 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला.
द मेकिंग ऑफ महात्मा गांधी (The Making Of The Mahatma) : 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द मेकिंग ऑफ महात्मा गांधी' या सिनेमात रजित कपूरने बापूंची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. हा चित्रपट हिट ठरला होता.
गांधी माय फादर (Gandhi My Father) : 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गांधी माय फादर' या चित्रपटात गांधीजींच्या हत्येचे आणि संघर्षाचे दिवस दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटात गांधींची भूमिका दर्शन जरीवाला आणि त्यांचा मुलगा अक्षय खन्ना याने साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.
लगे रहो मुन्ना भाई : हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत अर्शद वारसीही दिसला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि तो खूप गाजला.
नाइन ऑवर्स टू रामा : महात्मा गांधींवर बनलेला 'नाइन ऑवर्स टू रामा' हा चित्रपट 1963 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गांधीजींची हत्या आणि नथुराम गोडसे यांची कथा दाखवण्यात आली होती.
गांधी गोडसे-एक युद्ध (Gandhi Godse Ek Yudh) : 'गांधी गोडसे एक युद्ध' हा सिनेमा 2023 मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. राजकुमार संतोषी आणि मनीषा संतोषी यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती.
द गांधी मर्डर (The Gandhi Murder) : 'द गांधी मर्डर' हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पंकज सहगल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.
संबंधित बातम्या