एक्स्प्लोर

Box Office Collection : सनीचा 'गदर 2', रजनीकांतचा 'जेलर' अन् अक्षयचा 'OMG 2' बॉक्स ऑफिसवर सुसाट; अभिषेकच्या 'घूमर'चे आकडे मात्र निराशाजनक

Movies : 'गदर 2' (Gadar 2), 'जेलर' (Jailer), 'ओएमजी 2' (OMG 2) आणि 'घूमर' (Ghoomer) या सिनेमांसह 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमाही चांगली कमाई करत आहे.

Gadar 2 Jailer OMG 2 Ghoomer Box Office Collection : सिनेप्रेमींना सध्या मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2), थलायवा रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. अशातच आता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमाही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 

बॉक्स ऑफिसवर 'गदर 2'चा बोलबाला (Gadar 2 Box Office Collection)

'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित होऊन नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. ओपनिंग डे आणि वीकेंडला चांगलीच कमाई करणाऱ्या या सिनेमाने रिलीजच्या नऊ दिवसांत भारतात 336.13 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 395.1 कोटींचा गल्ला जमवला आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. 'गदर 2' या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल(Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) मुख्य भूमिकेत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर सिनेमा प्रदर्शित झाल्याचा निर्मात्यांना फायदा झाला आहे.

रजनीकांतच्या 'जेलर'ची काय स्थिती आहे? (Jailer Box Office Collection)

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा (Rajinikanth) मोठा चाहतावर्ग आहे. रजनीकांतच्या नावावरच त्याचे सिनेमे चालतात. त्याचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा प्रदर्शित होऊन दहा दिवस पूर्ण झाले आहेत. रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने 263.90 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने तब्बल 452 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.

अक्षयचा 'ओएमजी 2' 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील! (OMG 2 Box Office Collection)

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमा प्रदर्शित होऊन नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. रिलीजआधी या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाने नऊ दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 101.58 कोटींची कमाई केली आहे. 

'गदर 2' समोर टिकला नाही अभिषेक बच्चनचा 'घूमर' (Ghoomer Box Office Collection)

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) अभिनीत 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिषेकच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. दोन दिवसांत या सिनेमाने फक्त 2.5 कोटींची कमाई केली असून वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'गदर 2' (Gadar 2), 'जेलर' (Jailer), 'ओएमजी 2' (OMG 2) आणि 'घूमर' (Ghoomer) या सिनेमांसह 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमाही चांगली कमाई करत आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करेल. तर आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमालाही प्रेक्षकांची पसंती मिळत असून आतापर्यंत या सिनेमाने 299.4 कोटींची कमाई केली आहे.

संबंधित बातम्या

Box Office Collection : बॉलिवूड खूश हुआ! रजनीकांतवर भारी पडलाय सनी देओल; जाणून घ्या 'गदर 2', 'जेलर', 'घूमर' आणि 'OMG 2'च्या कमाईबद्दल...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMahim Vidhansabha Election Special Report : माहीमचा किल्ला, मतभेदाचे तडे?ABP Majha Headlines :  10  PM :   2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 9 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget