एक्स्प्लोर

Gadar 2 BO Collection: रक्षाबंधनाला सनीच्या ‘गदर 2’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; केली एवढी कमाई

'गदर 2' चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर 20 व्या दिवशी किती कमाई केली? हे जाणून घेऊयात...

Gadar 2 BO Collection Day 20: अभिनेता सनी देओल (Sunny Deol)  आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) यांच्या गदर 2 (Gadar 2) या चित्रपटानं रक्षाबंधनाला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या तिसऱ्या बुधवारी चित्रपटाच्या कमाईत मंगळवारच्या तुलनेत 80 टक्के आणि सोमवारच्या तुलनेत 100 टक्क्यांनी वाढ झाल्याच बघायला मिळत आहे. 'गदर 2' चित्रपटाने रिलीजच्या 20 व्या दिवशी किती कमाई केली? हे जाणून घेऊयात...

रक्षाबंधनाला 'गदर 2' चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर गर्दी केली. त्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'गदर 2' चित्रपटाने रिलीजच्या 20 व्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाला 8.75 कोटी रुपये कमाई केली आहे. यासह आता 'गदर 2' चित्रपटाची एकूण कमाई 474.5 कोटींवर गेली आहे. हा चित्रपट लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असं म्हटलं जात आहे.

 रक्षाबंधनाच्या निमित्ताने 'गदर 2' च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने 'गदर 2'ची 2 तिकिटे विकत घेतल्यावर 2 तिकिटे मोफत देण्यात आली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

'गदर 2' हा चित्रपट 2001 मध्ये  रिलीज झालेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. गदर 2 चित्रपटामध्ये सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली. 'गदर 2'  या चित्रपटात तारा सिंह, त्याचा मुलगा आणि सकिना यांची कथा दाखवण्यात आली आहे.

सनी आणि अमिषासोबतच 'गदर 2' या चित्रपटामध्ये  लव्ह सिन्हा, सिमरित कौर आणि उत्कर्ष शर्मा  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  अनेक सेलिब्रिटींनी तसेच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

आता 'गदर 2' या चित्रपटानंतर सनी देओल  'माँ तुझे सलाम 2'  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), तब्बू (Tabu), अरबाज खान (Arbaaz Khan) आणि टिन्नू वर्मा (Teenu Verma) हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

संबंधित बातम्या

Sunny Deol : अभिनेता सनी देओलचं विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन! 'गदर 2'च्या निर्मात्यांची प्रेक्षकांसाठी बंपर ऑफर; एका तिकीटावर दोन मोफत

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget