Gadar 2 : सनी देओलच्या 'गदर 2'ने रचला इतिहास; सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय? जाणून घ्या...
Gadar 2 : 'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Sunny Deol Ammesha Patel Gadar 2 Success Reasons : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Ameesha Patel) अभिनित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित या सिनेमाने इतिहास रचला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर (Independence Day) प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला मोठ्या वीकेंडचा चांगलाच फायला झाला आहे. 'गदर 2' हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सनी देओलचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते. त्यामुळेच त्याचा 'गदर 2' हा सिनेमा एवढा का चालतोय? असा प्रश्न उपस्थित होतो. तर 'गदर 2' हा सिनेमा चालण्याची नेमकी कारणं काय जाणून घ्या...
'गदर 2' हा सिनेमा यशस्वी होण्यामागची कारणं काय? जाणून घ्या... (Gadar 2 Success Reasons)
1. 'गदर 2' हा सिनेमा यशस्वी होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या सिनेमाची गोष्ट.
2. 2001 मध्ये आलेला 'गदर' हा सिनेमा माईलस्टोन ठरला होता. 'गदर 2' हा याच सिनेमाचा सीक्वेल असल्यामुळे नव्वदच्या दशकातील मंडळी हा सिनेमा पाहायला मोठ्या प्रमाणात जात आहे.
3. 'हमारा हिंदुस्तान झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा, असे सिनेमातील संवाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
4. भारतीय 'गदर' या सिनेमाचे चाहते असून या सिनेमाचा पुढचा भाग पाहायला ते पुन्हा सहकुटुंब जात आहेत.
5. 'गदर' या सिनेमाचे चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता अखेर 22 वर्षांनी सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे ते हा सिनेमा पाहायला जात आहेत.
6. तारा सिंह आणि सकिनाच्या केमिस्ट्रीची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे.
7. 'गदर 2' पाहून प्रेक्षक भारावले असून माउथ पब्लिसिटी करत आहेत.
8. सिनेमातील संवाद आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.
9. 'गदर 2' हा सिनेमा देशभक्तिवर आधारित असून निर्मात्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलीज केला आहे. त्यामुळे एक सच्चा भारतीय या सिनेमावर जीव ओवाळून टाकतो आहे.
10. 'उड जा काले कावां' आणि 'मैं निकला गड्डी लेके' ही 'गदर'मधील गाणी नव्या संचात, नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.
11. 'गदर 2' हा सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये रिलीज करण्यासोबत सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही रिलीज करण्यात आला आहे.
12. 'गदर 2' या सिनेमाचं प्रेक्षकांसह समीक्षकांनीही कौतुक केलं आहे.
13. सनी देओलचा मोठा चाहतावर्ग असून अभिनेत्याचा एक चांगला सिनेमा प्रदर्शित झाल्याने ते सिनेमा पाहायला जात आहेत.
14. 'गदर 2' हा सिनेमा एवढा का चालतोय आणि त्याची हाईप इतकी का आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक सिनेमा पाहायला जात आहेत.
15. #Gadar2HuiJantaKi हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे.
संबंधित बातम्या