RRR ते KGF 2; 'या' चित्रपटांच्या ट्रेलरची चाहत्यांमध्ये क्रेझ
Movie Trailer : सध्या सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सिने प्रेक्षकांमध्ये ट्रेलरबद्दल उत्सुकता दिसून येत आहे.
Bollywood Movies Trailer : भारतात सिनेमाप्रेमी खूप आहेत. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमा प्रदर्शित होण्याआधी ट्रेलरसाठी उत्सुक असतात. सध्या सिनेप्रेमी प्रेक्षकांमध्ये ट्रेलरची चांगलीच क्रेझ आहे. चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पाच सिनेमांच्या ट्रेलरसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
'केजीएफ 2' (KGF 2) : 'केजीएफ 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 24 तासांच्या आत त्याला 48 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते.
'आरआरआर' (RRR) : एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालतो आहे.या सिनेमाच्या ट्रेलरची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती.
'द कश्मीर फाइल्स'(The Kashmir files) : 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमा चांगलीच कमाई करत आहे.'द कश्मीर फाइल्स'चा ट्रेलर यूट्यबवर रिलीज होताच या ट्रेलरने चांगलाच धमाका केला आहे.
Runway 34 : अजय देवगण आणि अमिताभ बच्चनच्या 'रनवे 34' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.
Gehraiyaan : Gehraiyaan हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला असला तरी प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.
संबंधित बातम्या
RRR Box Office Collection Day 4: ‘आरआरआर’ने गाठला 500 कोटींचा टप्पा! हिंदी व्हर्जनचाही बॉक्स ऑफिसवर कल्ला!
Oscars 2022 : कोडा ते ड्युन; घरबसल्या पाहू शकता 'ऑस्कर' विजेते चित्रपट
Brahmastra Shoot Wrap : 5 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अखेर ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण! दिग्दर्शक अयान मुखर्जीची खास पोस्ट...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha