TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
पंडित शिवकुमार शर्मा अनंतात विलीन
पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावर मुंबई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या राहुल आणि रोहित शर्मा या दोन मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. मुखाग्नी देण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने तीन राऊंड फायर करत पंडित शिवकुमार शर्मा अखेरची मानवंदना दिली. यावेळी शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच त्यांचे चाहते उपस्थित होते.
यशच्या 'केजीएफ 2' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; जगभरात केली 1160 कोटींची कमाई
यशचा 'केजीएफ 2' (KGF: Chapter 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. एका महिन्याच्या आता या सिनेमाने जगभरात 1160 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांना चांगलाच नफा मिळाला आहे. 'केजीएफ 2' हा सिनेमा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.
शाहीर साबळेंनी सिनेमातील गाणी का गायली नाहीत? केदार शिंदेंनी शेअर केली पोस्ट
केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे. केदार शिंदेंनी आता शाहीर साबळे यांच्यासंदर्भात माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
'अमूल'नं पंडित शिवकुमार शर्मा यांना वाहिली श्रद्धांजली
प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने संगीत विश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शिवकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. आता अमूल या कंपनीनं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनोख्या पद्धतीनं त्यांना आदरांजली वाहिली आहे.
रणवीर सिंह आणि टायगर श्रॉफ बॉक्स ऑफिसवर आमने-सामने
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने नुकतीच त्याच्या आगामी 'सर्कस' सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा सिनेमा 23 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच टायगर श्रॉफचा'गणपत' सिनेमादेखील 23 डिसेंबरलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे हे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत.
'या' आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती?
मराठी मालिका विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टीआरपीच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 43.4 रेटिंग मिळाले आहे.
'मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा' 14 मे दिवसापासून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. छोट्या उस्तादांनी आपल्या सुरेल गाण्यांनी या पर्वाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. छोट्या उस्तादांच्या या धमाकेदार पर्वानंतर श्रीगणेशा होतोय नव्या पर्वाचा. ‘मी होणार सुपरस्टार...आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ या नव्या शोमध्ये छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजेच 4 ते 70 या वयोगटातील स्पर्धकांना आपलं टॅलेण्ट दाखवण्याची संधी मिळणार आहे.
दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलची ज्युरी मेंबर झाल्यावर रणवीरनं दिली रिअॅक्शन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या जयेशभाई जोरदार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीर त्याच्या पत्नीला म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणला नेहमी सपोर्ट करतो. काही दिवसांपूर्वी 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादी जाहीर झाली. या ज्युरी मेंबर्समध्ये दीपिकाचं नाव देखील आहे. जेव्हा दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलची ज्युरी मेंबर झाली. तेव्हा रणवीरनं हटके रिअॅक्शन दिली.
भिक मागणाऱ्या महिलेला पैसे न दिल्यानं पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान ट्रोल
अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) आणि श्वेता तिवारीची (Shweta Tiwari)मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) हे सध्या चर्चेत आहेत. इब्राहिम आणि पलक यांच्या अफेरची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. इब्राहिम आणि पलक हे सध्या एकत्र टाईम स्पेंड करताना दिसतात. जेव्हा पहिल्यांदा पलक आणि सैफ यांचा गाडीमधून जात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, तेव्हा पलक तिचा चेहरा लपवताना दिसत होती. त्यामुळे अनेकांनी त्या दोघांना ट्रोल केले. आता पुन्हा एकदा पलक आणि इब्राहिमला नेटकरी ट्रोल करत आहेत.
बाळाला पकडण्याच्या पद्धतीमुळे देबिनाला केलं नेटकऱ्यांनी ट्रोल
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. 3 एप्रिल रोजी देबिना आणि गुरमीत चौधरी यांना कन्यारत्न प्राप्त झालं. देबिना आणि गुरमीतनं त्यांच्या मुलीचं नाव लियाना असं ठेवलं आहे. सध्या देबिना ही तिच्या बेबी गर्लसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. हे फोटो पाहून अनेक नेटकरी देबिना सध्या ट्रोल करत आहेत. नेटकऱ्यांच्या मते, देबिना ही बाळाला चुकीच्या पद्धतीनं धरत आहे.
संबंधित बातम्या