एक्स्प्लोर
'बाहुबलीः दी कन्क्लुझन' चा लोगो रिलीज
हैदराबादः 'बाहुबली' या 2015 मधील ब्लॉकबस्टर सिनेमाचा स्किक्वेल 'बाहुबलीः दी कन्क्लुझन' च्या लोगोचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस राजामौली यांनी हैदराबादेत पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली.
सिनेमाचा अभिनेता प्रभासच्या जन्मदिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 22 ऑक्टोबरला सिनेमाचा फर्स्ट लूक जारी करण्यात येणार आहे. याची घोषणा राजामौली यांनी अगोदरच केली आहे. मात्र या पोस्टरमधून प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.
https://twitter.com/ssrajamouli/status/781892108667846656
कटप्पाने बाहुबलीला का मारलं, या अवघ्या जगाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर या सिनेमातून मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढणं साहजिकच आहे. आता सिनेमाच्या फर्स्ट लूककडे म्हणजे 22 ऑक्टोबरकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement