Fighter First Movie Review : हृतिकचा 'फायटर' पाहावा की नाही? सिनेमाच्या रिलीजआधीच वाचा फर्स्ट रिव्ह्यू
Fighter First Movie Review Out : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करण्यास हा सिनेमा सज्ज आहे.
![Fighter First Movie Review : हृतिकचा 'फायटर' पाहावा की नाही? सिनेमाच्या रिलीजआधीच वाचा फर्स्ट रिव्ह्यू Fighter First Movie Review Hrithik Roshan Deepika Padukone Siddharth Anand Anil Kapoor Film review viral Social Media Bollywood Entertainment Latest Update Fighter First Movie Review : हृतिकचा 'फायटर' पाहावा की नाही? सिनेमाच्या रिलीजआधीच वाचा फर्स्ट रिव्ह्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/24/8ee6270f5554b8ffc0d8853b3d5f40f51706061080006254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fighter First Movie Review Out : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर 'फायटर' (Fighter) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'फायटर' हा सिनेमा रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. रिलीजआधी या सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे.
'फायटर' हा सिनेमा रिलीजआधीपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 'पठाण'नंतर 'फायटर' हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा खूप आहेत.
सिनेमागृहात धमाका करणार हृतिक-दीपिकाचा 'फायटर' (Hrithik Roshan Deepika Padukone Fighter First Review)
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण स्टारर 'फायटर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ऑलवेज बॉलिवूडने 'फायटर'चा रिव्ह्यू केला आहे. सिनेमाच्या फर्स्ट रिव्ह्यूनुसार, 'फायटर' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. सिनेमाचं कथानक आणि देशभक्तिबद्दल भाष्य करणारा हा सिनेमा आहे. तगडी स्टारकास्ट असणारे सिनेमे, शानदार फ्लाइंग मशीन्स, खतरनाक खलनायक आणि उत्तम कथानक असल्यामुळे हा सिनेमा उत्कृष्ट झालेला आहे.
#FighterReview : ⭐⭐⭐1/2….#Fighter offers you enough aerial actions mixed in with back stories and patriotism that is easy to follow .... Good looking lead actors,
— Always Bollywood (@AlwaysBollywood) January 23, 2024
Great looking flying machines, dreadful villain with engaging script make this a perfect big screen watch...👍 pic.twitter.com/ElI5SyDOfn
'फायटर'ची स्टारकास्ट (Fighter Starcast)
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' या सिनेमात अॅक्शन वॉर आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर, हृषभ साहनी हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'फायटर' किती कोटींची कमाई करणार?
'फायटर' हा बिग बजेट सिनेमा आहे. 250 कोटींमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता सिनेमा पठाण, जवान या सिनेमांचा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीजआधीच या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. पोस्टर, टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढवली आहे.
संबंधित बातम्या
Fighter Advance Booking : हृतिक रोशनच्या 'फायटर'ने रिलीजआधी केली छप्परफाड कमाई; जाणून घ्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)