Fighter Advance Booking : हृतिक रोशनच्या 'फायटर'ने रिलीजआधी केली छप्परफाड कमाई; जाणून घ्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल
Fighter Movie : हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) 'फायटर' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
Fighter Advance Booking : हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) 'फायटर' (Fighter) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'फायटर' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 20 जानेवारी 2024 पासून या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या दोन दिवसांत 'फायटर'च्या 2.86 कोटी रुपयांच्या तिकीटांची विक्री झाली आहे. देशभरात 7595 शोजच्या अॅडव्हान्स बुकिंगची विक्री झाली आहे. रविवारी रात्रीपर्यंत 87 हजार 163 तिकीट विकले गेले आहेत. यात 2D, 3D, IMAX 3D आणि 4DX 3D या शोजचा समावेश आहे.
View this post on Instagram
'फायटर' किती कोटींची कमाई करणार?
'फायटर' या सिनेमाची निर्मिती 250 कोटी रुपयांत करण्यात आली आहे. रिलीजआधी 'फायटर'ने 10-20 कोटींची कमाई केली आहे. तर देशभरात हा सिनेमा रिलीजआधी 25-30 कोटींची कमाई करू शकतो. त्यामुळे हा सिनेमा सहा वर्षांपूर्वी आलेल्या 'पद्मावत' सिनेमाचा 24 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो, असे म्हटले जात आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'फायटर'
'फायटर' या सिनेमात दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'फायटर'ने महाराष्ट्रात 75.2 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. तेलंगनात 40.73 लाख, कर्नाटकात 43.54 लाखांची कमाई केली आहे.
'फायटर' हा 2 तास 46 मिनिटांचा सिनेमा आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे. देशभरात हा सिनेमा 7,537 स्क्रीनवर रिलीज होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत वायकॉम 18 ने केली आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणसह अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर, संजीदा शेखसह अनेक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'फायटर' या सिनेमात हृतिक रोशन वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टर, टीझर, ट्रेलर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक या बहुचर्चित सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमातील लक्षवेधी संवाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. 'फायटर' हा सिनेमा 2024 गाजवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या