Sonu Sood : सोनू सूदच्या कार्याला सोलापूरच्या चाहत्यांनं दिली तिरंगा रांगोळी काढून सलामी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला,"माझ्याकडे शब्द नाहीत"
Sonu Sood : सोलापूरच्या एका रांगोळी कलाकाराने सोनू सूदची भव्यदिव्य रांगोळी साकारली आहे.
Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) खऱ्या अर्थाने हिरो आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच चाहत्यांच्या मदतीला धावून जात असतो. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील आपल्या लाडक्या सेलिब्रिटीसाठी काही ना काही करत असतात. कोरोना काळात अभिनेता सोनू सुदने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याला सोलापूरच्या चित्रकार विपूल मिरजकरची तिरंगा रांगोळी काढून सलामी दिली आहे. रांगोळीचं स्वतः सोनू सूदनं कौतुक केलं आहे.
सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूदची एक भव्य दिव्य रांगोळी दिसत आहे. सोलापूरातील (Solapur) सोनू सूदच्या एका चाहत्याने तब्बल 87 हजार स्क्वेअर फुटांमध्ये ही रांगोळी खास अभिनेत्यासाठी काढली आहे. श्रीपाद मिरजकर (Shripad Mirajkar) असे या रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचे नाव आहे.
श्रीपाद मिरजकरने एका उद्यानात ही रांगोळी काढली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो ही रांगोळी काढत होता. अखेर प्रजासत्ताक दिनी ही रांगोळी पूर्ण झाली असून आता दररोज हजारो मंडळी ही रांगोळी पाहण्यासाठी येत आहेत.
सोनू सूदने शेअर केला व्हिडीओ (Sonu Sood Shared Video)
सोनू सूदने (Sonu Sood) रांगोळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हीडिओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"माझ्याकडे खरचं शब्द नाहीत. चाहत्यांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. 87,000 स्क्वेअर फुटांची रांगोळी काढण्याऱ्या कलाकाराचे आभार... मला त्याचा खूप अभिमान आहे".
View this post on Instagram
सोनू सूदने कोरोनाकाळात अनेक गरजूंना मदत केली आहे. आजही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असून त्यांच्या मदतीला धावून जात असतो. अनेक सामाजिक उपक्रमांचा सोनू सूद भाग आहे. अभिनयाची आवड जोपासत तो सामाजिक विषयांवरदेखील व्यक्त होत असतो.
सोनू सूदचे आगामी प्रोजेक्ट (Sonu Sood Upcoming Project)
सोनू सूदचा 'फतेह' (Fateh) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनंदन गुप्ताने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात सोनू सूदचा अॅक्शन मोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनू लवकरच 'किसान' (Kisan) सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
संबंधित बातम्या