Sharda Rajan Iyengar: गायिका शारदा राजन अय्यंगार यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
वयाच्या 50 व्या वर्षी प्रभू देवा झाला बाप; दुसऱ्या पत्नीनं दिला मुलीला जन्म
Prabhu Deva: बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर दिग्दर्शक प्रभूदेवा (Prabhu Deva) हा वयाच्या 50 व्या वर्षी बाप झाला आहे. प्रभूदेवाची दुसरी पत्नी हिमानीनं एका मुलीला जन्म दिला आहे. प्रभूदेवानं एका मुलाखतीमध्ये ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिला आहे. एका मुलाखतीमध्ये प्रभूदेवाने ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यानी सांगितले की, 'होय ही बातमी खरी आहे. या वयात म्हणजेच 50 व्या वर्षी मी पुन्हा बाप झालो आहे आणि मी खूप आनंदी आहे.'
The Archies New Poster : 'द आर्चीज'चं नवं पोस्टर आऊट
The Archies : 'द आर्चीज' (The Archies) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमात अनेक स्टार किड्स झळकणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Gadar 2 Teaser Out : 'दामाद है वो पाकिस्तान का उसे टीका लगाओ वरना..'; सनी देओलच्या 'गदर 2'चा धमाकेदार टीझर आऊट
Sunny Deol Gadar 2 Teaser Out : सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. तारा सिंह आणि सकीनाची जोडी 21 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'गदर 2' या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.'गदर 2'च्या टीझरच्या सुरुवातीला एका महिलेचा आवाज ऐकू येत आहे. ती म्हणत आहे,"दामाद है ये पाकिस्तान का, उसे नारियल दो, टीका लगाओ वरना इस बार वो दहेज में पूरा लाहौर जाएगा". 'गदर 2'चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'गदर 2'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.