Sukh Mhanje Nakki Kay Asta: शालिनी घेतेय तंत्र विद्येचा आधार; 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' च्या प्रोमोनं वेधलं लक्ष
'सुख म्हणजे नक्की काय असतं!' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. जयदीप आणि गौरी यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचं काम शालिनी करत असते. 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गौरी आणि जयदीप यांना त्रास देण्यासाठी शालिनी ही तंत्र विद्येचा आधार घेणार आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं!' या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गौरी आणि जयदीप हे एकमेकांसोबत गप्पा मारत आहे. त्यानंतर जयदीप गौरीला म्हणतो, 'तू शांत झोप तू डोळे उघडशील तेव्हा मी तुझ्या समोर असेल.' त्यानंतर जयदीप एका कामासाठी जातो. जयदीप गेल्यानंतर गौरी म्हणते, 'कशी शांत झोपू? विचित्र विचार माझ्या मनात येत आहेत. एखादी वाईट शक्ती आपल्यामध्ये येणार आहे, असं का वाटतंय? '
पुढे प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी ही एका गुहेत जाते. त्या गुहेमधील एक व्यक्ती म्हणतो, 'मनात शंका असणाऱ्यांनी इथे येऊ नये. तुझ्या सगळ्या इच्छा आम्ही पूर्ण करु' यावर शालिनी 'थँक्यु' म्हणते. त्या गुहेतील व्यक्तीला शालिनीनं आधी पाहिलेलं असतं. त्या व्यक्तीला शालिनी म्हणते, 'खूप प्रयत्न केले, पण माझ्या मनासारखं होत नाही, काम थोडं नाजूक आहे पण डेंजर आहे.' यावर तो गुहेतील व्यक्ती शालिनीला म्हणतो, 'इथे कोणीच क्षुल्लक कामं घेऊन येत नाहीत. गौरी आणि जयदीपचा बंदोबस्त करण्यासाठी तू आमच्याकडे आली आहेस.'
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :