(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Entertainment News Live Updates 2 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
आजच्या पिढीतील लग्नाची गोष्ट सांगणारा ‘36 गुण’
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात 'लग्न' ही फार महत्वाची गोष्ट असते. दोन व्यक्तींना, कुटुंबांना त्याचबरोबर जबाबदाऱ्यांना जोडणारा हा अत्यंत महत्वाचा काळ असतो. पण त्याचबरोबर लग्न प्रक्रियेत लग्नपत्रिकेलाही तितकेच महत्त्व दिले जाते. मात्र, घरदार, कुटुंब, शिक्षण, नोकरी-व्यवसाय आणि सगळ्यात महत्त्वाचे लग्नपत्रिकेतले ‘36 गुण’ (36 Gunn) जुळूनही लग्नं यशस्वी होतात का? या प्रश्नांची उत्तरं देणारा समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेला ‘36 गुण’ हा आजच्या पिढीला जवळचा वाटेल असा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आणि अभिनेत्री पूर्वा पवार (Purva Pawar) यांची मुख्य भूमिका असलेल्या ’36 गुण’ चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकारसुद्धा दिसणार आहेत.
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती लेलेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
'अबोली' ही सिरियल, 'पत्त्यांचा बंगला' सारखं व्यावसायिक नाटक, 'रविवार डायरीज' सारख्या प्रायोगिक नाटक अशा कलाकृतींमधून महत्त्वाच्या भूमिका साकारणारी चतुरस्त्र अभिनेत्री दीप्ती लेले आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणाऱ्या 'फोन भूत' या सिनेमात दीप्ती दिसणार आहे. गुरमीत सिंगद्वारे दिग्दर्शित आणि रविशंकरन-जसविंदर सिंग बाथ लिखित, ‘फोन भूत’या सिनेमाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटचे प्रमुख रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गायत्री दातारची होणार एन्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेने सहा वर्षांचा लीप घेतला आहे. या लीपनंतर मालिकेच्या कथानकात अनेक बदल करण्यात आले आहेत. सध्या वाहिनीवर दाखवण्यात आलेल्या प्रोमोनुसार जयदीप आणि गौरी एकमेकांपासून दुरावल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जयदीप गौरीची पुन्हा भेट होणार का? याची उत्सुकता नक्कीच आहे. मात्र, मालिकेत लवकरच नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. रुही कारखानीस असं या नव्या पात्राचं नाव असून अभिनेत्री गायत्री दातार (Gayatri Datar) ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता Y+ सुरक्षेचं कवच
बॉलिवूडचा दबंग सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाढवली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीनंतरच राज्य सरकारने सलमान खानची सुरक्षा वाढवली असून त्याला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची सुरक्षा वाढवली आहे. याचा अर्थ सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता चार शस्त्रधारी सुरक्षारक्षक 24 तास सुरक्षा पुरवणार आहेत.
Shark Tank India Season 2: ‘शार्क टँक इंडिया 2’चा प्रोमो रिलीज; हे दोन शार्क्स 'आऊट' तर नव्या शार्कची एन्ट्री
Shark Tank India Season 2: स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊयात शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या शोमध्ये येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात. छोट्या पडद्यावरील या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘शार्क टँक इंडिया 2’(Shark Tank India Season 2) या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे.
सोनी टीव्हीनं सोशल मीडियावर शार्क टँक इंडिया सीझन 2 चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एका महिला भाजी घेताना दिसत आहे. यावेळे तो भाजीवाला शार्क टँक ज्या स्टाईलनं भाजी विकताना दिसत आहे. आता पूर्ण भारताला समजेल व्यवसायाचे खरे मूल्य, ही टॅगलाइन देखील प्रोमोमध्ये दिसत आहे. या प्रोमोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
Ab pura India business ki sahi value samjhega! 💸#SharkTankIndiaSeason2 coming soon, on Sony Entertainment Television#SharkTankIndiaSeason2onSony pic.twitter.com/Pw7XDLiLee
— sonytv (@SonyTV) November 1, 2022
Bigg Boss Marathi 4 : मिरचीची धुरी, पाणी, तेल... टास्कमध्ये होणार खुल्ला राडा!
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. हा कार्यक्रम वादग्रस्त असला तरी तितकाच लोकप्रिय आहे. स्पर्धकांच्या वादामुळे हे पर्व आणखीनच रंगले आहे. सध्या बिग बॉसच्या घरात 'खुल्ला करायचा राडा' हे कार्य रंगत आहे.
View this post on Instagram
Sunny Marathi Movie: 'सनी'च्या मित्रांच्या भूमिकेत दिसणार 'हे' अभिनेते; पाहा टीझर
Sunny Marathi Movie: 'आई कुठे काय करते' मधून घराघरांत पोहोचलेला अभिषेक देशमुख आणि सहकुटुंब सहपरिवार' मधील अमेय बर्वे आता हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच त्यांची व्यक्तिरेखा समोर आली असून यात ते 'सनी'चे (Sunny) खास मित्र दाखवले आहेत आणि यात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे ती युकेच्या पॉऊलोने.
Thipkyanchi Rangoli : ठिपक्यांची रांगोळी मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची होणार एण्ट्री
Thipkyanchi Rangoli : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा आता त्यांना परका होणार आहे. विनायक दादांनी वाडा विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कानिटकर कुटुंबात नाराजीचा सूर आहे. अश्यातच मालिकेत दुर्गा आत्याची एण्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे दुर्गा आत्याची भूमिका साकरणार असून बऱ्याच वर्षांनंतर त्या मराठी मालिकेत दिसणार आहेत.
Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट
Marathi Serial Trp Rating : टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. टीआरपी लिस्टमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.