Subodh Bhave: सुबोध भावेची नवी संगीतमय कलाकृती येणार प्रेक्षकांच्या भेटीस; आगामी चित्रपटाबद्दल म्हणाला, 'पुण्यातील FTII च्या पवित्र जागेत...'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 21 Sep 2023 06:54 PM
Subodh Bhave: सुबोध भावेची नवी संगीतमय कलाकृती येणार प्रेक्षकांच्या भेटीस; आगामी चित्रपटाबद्दल म्हणाला, "पुण्यातील FTII च्या पवित्र जागेत..."
Subodh Bhave: सुबोधनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन "मानापमान" या आगामी चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. Read More
Prithvik Pratap: पृथ्वीक आणि प्रियदर्शनीनं ‘चलेया’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स, समीर चौघील कमेंट करत म्हणाला, "मी आधीच म्हणत होतो..."
चलेया या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) आणि पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) यांनी शेअर केला आहे. Read More
Telly Masala : उत्कर्ष शिंदेनं शेअर केला प्रल्हाद शिंदेंचा खास व्हिडीओ ते 'बॉईज 4'मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Kaun Banega Crorepati 15: 'केबीसी 15' मध्ये आझमगडच्या जसलीन कुमारनं जिंकले एक कोटी रुपये; जिंकलेल्या पैशांचा वापर करणार 'या' कामासाठी
उत्तर प्रदेशातील आझमगड (Azamgarh) जिल्ह्यातील रहिवासी जसलीन कुमारने (Jasleen Kumar) देखील केबीसी-15 या कार्यक्रमामध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत.  Read More
Utkarsh Shinde: “देवाला आवडणारा आवाज”; उत्कर्ष शिंदेनं शेअर केला प्रल्हाद शिंदेंचा खास व्हिडीओ
Utkarsh Shinde: नुकताच उत्कर्ष एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला उत्कर्षनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Sankarshan Karhade: "आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं हवेत आहे"; संकर्षणची खास पोस्ट
Sankarshan Karhade: नुकतेच संकर्षणनं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो विमानाच्या  केबिनमध्ये बसलेला दिसत आहे. Read More
National Cinema Day 2023 : राष्ट्रीय चित्रपट दिनी पुन्हा एकदा थिएटर होणार हाऊसफुल्ल! फक्त 99 रुपयांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार सिनेमा
National Cinema Day : राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त प्रेक्षकांना 99 रुपयांत सिनेमा पाहता येणार आहे. Read More
Akhil Mishra Death: '3 इडियट्स' फेम अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन; वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Akhil Mishra Death: अखिल मिश्रा यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. Read More
Happy Birthday Kareena Kapoor : '3 इडियट्स' ते 'बजरंगी भाईजान'; करीना कपूरच्या वाढदिवसानिमित्त IMDB वरील तिच्या 'TOP 10' सर्वाधिक रेटिंग असलेल्या सिनेमांबद्दल जाणून घ्या...
Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. Read More
Boyz 4 : गौरव मोरे ते पार्थ भालेराव; 'बॉईज 4'मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
Boyz 4 : 'बॉईज 4' या सिनेमात दमदार कलाकारांची फळी झळकणार आहे. Read More
Tanushree Dutta: "इतके धर्म बदलूनही ती..."; तनुश्री दत्तानं राखी सावंतवर केले गंभीर आरोप
Adil Durrani-Tanushree On Rakhi Sawant: तनुश्री दत्तानं आदिल खानला सपोर्ट करुन राखी सावंतवर काही गंभीर आरोप केले आहेत. Read More
Kaala Paani Teaser : 'काला पानी'चा टीझर आऊट! अमेय वाघ आणि आशुतोष गोवारीकर मुख्य भूमिकेत
Kaala Paani : 'काला पानी' या वेबसीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Hemangi Kavi : बाप्पाचं चित्र ते गणेशोत्सवात मिळालेलं पहिलं बक्षीस; हेमांगी कवी म्हणते,"बाप्पा माझा इमेजनरी मित्र"
Kalavantancha Bappa : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' या सेगमेंटमध्ये अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) म्हणाली की बाप्पा आणि तिचं नातं खूप वेगळं आहे. Read More
Shubhneet Singh : शुभनीत सिंहला खालिस्तानींना पाठिंबा देणं पडलं महागात; भारत दौरा रद्द.. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...
Shubhneet Singh : खालिस्तानींना समर्थन देणं शुभनीत सिंहला महागात पडलं आहे. Read More
Kangana Ranaut : कंगना रनौतला भारतीय संस्कृतीचा अभिमान; 'पंगाक्वीन' म्हणाली,"भारत' म्हणायला मला आवडतं पण कधी 'इंडिया'..."
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने देशाचं नाव इंडिया हवं की भारत याबद्दल आपलं मत मांडलं आहे. Read More
Raghav Chadha-Parineeti Chopra : मेहंदी है रचने वाली! परिणीती चोप्राच्या हाती रंगली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी
Parineeti Chopra Mehandi : अभिनेत्री परिणीती चोप्राच्या हातावर राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी लागली आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.