एक्स्प्लोर

Akhil Mishra Death: '3 इडियट्स' फेम अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन; वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Akhil Mishra Death: अखिल मिश्रा यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Akhil Mishra Death: थ्री इडियट्स (3 Idiots) या चित्रपटात लायब्रेरियन दुबी ही भूमिका साकारलेले अभिनेते अखिल मिश्रा (Akhil Mishra) यांचे निधन झाले आहे.  किचनमध्ये काम करत असताना अखिल मिश्रा हे कोसळले, असं म्हटलं जात आहे. अखिल मिश्रा यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

"तो एक अपघात होता. किचनमध्ये ते जमिनीवर जखमी अवस्थेत आढळून आले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. आता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे." अशी माहिती आयएएनएसला सोर्सनं दिली आहे. ही घटना घडली तेव्हा अखिल यांची पत्नी सुझान बर्नर्ट ही हैदराबादमध्ये शूटिंग करत होती. "माझे हृदय तुटले आहे, माझ्या आयुष्याचा  भाग मला सोडून गेला आहे." अशा भावना अखिल मिश्रा यांच्या निधनानंतर सुझाननं व्यक्त केल्या आहेत.

 अखिल मिश्रा यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अखिल मिश्रा यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Akhil Mishra (@the_akhil_mishra_)

अखिल मिश्रा यांचे चित्रपट

अखिल मिश्रा यांनी  डॉन , हजारों ख्वैशीं ऐसी, गांधी  माय फादर ,  शिखर ,  कमला की मौत,  वेल डन अब्बा या चित्रपटांमध्ये काम केलं. '3 इडियट्स'मधील दुबे या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.  प्रधान मंत्री या मालिकेत देखील त्यांनी काम केले.  ते उतरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, हातिम आणि इतर अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांचा भाग होते.

अखिल यांचे पहिले लग्न 1983 मध्ये मंजू मिश्रा यांच्याशी झाले होते.  या दोघांनी 1983 मध्ये 'धत तेरे...की' या फिचर फिल्ममध्ये आणि 'गृहलक्ष्मी का जिन' या मालिकेत  काम केले होते. 1997 मध्ये मंजूच्या मृत्यूनंतर, अखिल यांनी फेब्रुवारी 2009 मध्ये जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी लग्न केले. सुझान बर्नर्टनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.   कसौटी जिंदगी की, सावधान इंडिया, एक हजारों में मेरी बहना है, चक्रवर्ती अशोक सम्राट, ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.

संबंधित बातम्या:

Rio Kapadia Demise: चक दे इंडिया फेम अभिनेते रिओ कपाडिया यांचे निधन; वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget