(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Kareena Kapoor : '3 इडियट्स' ते 'बजरंगी भाईजान'; करीना कपूरच्या वाढदिवसानिमित्त IMDB वरील तिच्या 'TOP 10' सर्वाधिक रेटिंग असलेल्या सिनेमांबद्दल जाणून घ्या...
Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
Kareena Kapoor Birthday : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा (Kareena Kapoor) आज वाढदिवस आहे. 21 सप्टेंबर 1989 रोजी मुंबईत जन्मलेल्या करीनाचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. करीनाने 2000 मध्ये 'रेफ्युजी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर अभिनेत्रीने 'चमेली','अशोका','जब वी मेट','3 इडियट्स','बजरंगी भाईजान' आणि इतर अनेक सिनेमांत तिने काम केलं आहे. अभिनेत्रीने नुकतेच 'जाने जान' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
पहिलाच सिनेमा सुपरहिट
रणधीर कपूर आणि बाबीता यांची छोटी लेक करीना (Kareena Kapoor) 2000 मध्ये राकेश रोशन यांच्या 'कहो न प्यार है' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. पण काही कारणाने तिला हा सिनेमा सोडावा लागला. त्यानंतर अभिनेत्रीने 'रिफ्यूजी' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला पण अभिनेत्रीच्या अभिनयाचं मात्र सर्वत्र कौतुक झालं. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. करीनाच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
करीना कपूरचे 10 गाजलेले सिनेमे जाणून घ्या... (Kareena Kapoor Top 10 Movies IMDB Rating)
1. 3 इडियट्स : करीना कपूरचा '3 इडियट्स' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाला 8.4 रेटिंग मिळाले आहे.
2. बजरंगी भाईजान : 'बजरंगी भाईजान' या सिनेमात करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत होती. या सिनेमाला 8.1 रेटिंग मिळाले आहे.
3. ओंकार : बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूरच्या 'ओंकार' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 8.0 रेटिंग मिळाले आहे.
4. जब वी मेट : करीना कपूरच्या 'जब वी मेट' या सिनेमाला 7.9 रेटिंग मिळाले आहे.
5. उडता पंजाब : करीना कपूरचा 'उडता पंजाब' हा सिनेमा सुपरहिट ठरला आहे. या सिनेमाला 7.7 रेटिंग मिळाले आहे.
6. कभी खुशी कभी गम : करीना कपूरच्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.4 रेटिंग मिळाले आहे.
7. युवा : करीना कपूरच्या 'युवा' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.3 रेटिंग मिळाले आहे.
8. तलाश : करीनाचा 'तलाश' हा सिनेमादेखील सुपरहिट ठरला. या सिनेमाला 7.2 रेटिंग मिळाले आहे.
9. अंग्रेजी मीडियम : करीना कपूरच्या 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.2 रेटिंग मिळाले आहे.
10. करीनाच्या 'Hulchul' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.0 रेटिंग मिळाले आहे.
संंबंधित बातम्या