Kaun Banega Crorepati 15: 'केबीसी 15' मध्ये आझमगडच्या जसलीन कुमारनं जिंकले एक कोटी रुपये; जिंकलेल्या पैशांचा वापर करणार 'या' कामासाठी
उत्तर प्रदेशातील आझमगड (Azamgarh) जिल्ह्यातील रहिवासी जसलीन कुमारने (Jasleen Kumar) देखील केबीसी-15 या कार्यक्रमामध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत.
Kaun Banega Crorepati 15: कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15) हा शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आता. जसकरण हा स्पर्धक केबीसी-15 या कार्यक्रमाचा करोडपती ठरला होता. आता उत्तर प्रदेशातील आझमगड (Azamgarh) जिल्ह्यातील रहिवासी जसलीन कुमारने (Jasleen Kumar) देखील केबीसी-15 या कार्यक्रमामध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत.
केबीसी-15 मध्ये जसलीन कुमारनं एक कोटी रुपये जिंकले आहेत. जसलीन कुमार हा उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो मोटर मेकॅनिक रामसूरत चौहान यांचा मुलगा आहे. आझमगड शहरातील एका कापड शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करणाऱ्या जसलीन कुमारला पैशांअभावी पदवीचे शिक्षणही पूर्ण करता आले नाही. जसलीन कुमारची आई राधिका देवी या गृहिणी आहेत. जसलीन कुमार हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.
'कौन बनेगा करोडपती 15' या कार्यक्रमामध्ये बिग बींनी जसलीन कुमारला विचारले की,'जिंकलेल्या रक्कमेचा कशासाठी वापर करणार? ' अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाचं जसलीन कुमारनं उत्तर दिलं की, 'जिंकलेल्या बक्षीसाच्या पैशांचा वापर मी घर बांधण्यासाठी करणार आहे. सध्या माझे अर्धे कच्चा आणि अर्धे पक्के आहे, म्हणूनच सर्वात आधी मी आई-वडिलांसाठी चांगले पक्के घर बांधणार आहे.'
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
पंजाबचा जसकरण हा केबीसीच्या 15 व्या सीझनचा पहिला करोडपती झाला आहे. त्यानंतर आता जसलीन कुमार हा एक कोटी जिंकला आहे.
केबीसीमध्ये जाण्यासाठी केलेल्या तयारीबाबत जसलीननं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, "मला सुरुवातीपासूनच वर्तमानपत्र वाचण्याची आवड आहे. 1998 पासून मी सतत वर्तमानपत्र वाचत आहे. वर्तमानपत्रामधून मला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, राजकारण आणि मनोरंजनाविषयी माहिती मिळते.' त्याने सांगितले की केबीसीच्या हॉट सीटपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 12 वर्षे लागली.
अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) हा शो होस्ट करत आहेत. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची (KBC) सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले.
संबंधित बातम्या: