Welcome To The Jungle: 'वेलकम टू जंगल'च्या शूटिंगला सुरुवात; खिलाडी कुमारनं शेअर केला चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 13 Dec 2023 08:56 PM
Welcome To The Jungle: 'वेलकम टू जंगल'च्या शूटिंगला सुरुवात; खिलाडी कुमारनं शेअर केला चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ
नुकताच अक्षयनं (Akshay Kumar) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय हा लारा दत्ता (Lara Dutta), अरशद वारसी (Arshad Warsi), दिशा पटानीसोबत (Disha Patani) सीन शूट करताना दिसत आहे. Read More
Smriti Irani: "भिडू वजन कमी कर, अंडी खा, वांगी खा"; जॅकी श्रॉफसोबतच्या फोटोला स्मृती इराणींनी दिलं भन्नाट कॅप्शन
Smriti Irani: स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि जेडी मजेठिया (JD Majethia)  यांच्यासोबतचा फोटो शेअर केले आहे. या फोटोला त्यांनी मजेशीर कॅप्शन दिलं आहे. Read More
Dunki First Reviewशाहरुखचा 'डंकी' पाहून तुमचे डोळे पाणावतील; कसा आहे चित्रपट? वाचा पहिला रिव्ह्यू
Dunki First Review: डंकी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू एका ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात डंकी चित्रपटाच्या रिव्ह्यूबाबत... Read More
Gautami Patil: राजकारणात एन्ट्री ते मराठा आरक्षण; नृत्यांगणा गौतमी पाटील भरभरुन बोलली
Gautami Patil: आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. Read More
Tripti Dimri And Vicky Kaushal: 'अॅनिमल'मधील 'भाभी-2' आता विकी कौशलसोबत करणार रोमान्स; तृप्ती आणि विकीचे फोटो व्हायरल
तृप्ती (Tripti Dimri) ही सध्या अॅनिमल चित्रपटासोबतच व्हायरल झालेल्या काही फोटोंमुळे देखील चर्चात आहे. या फोटोमध्ये तृप्ती आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. Read More
Telly Masala : अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन ते माधुरीच्या 'पंचक'चा ट्रेलर रिलीज; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Ms Dhoni : अजय देवगनसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार महेंद्र सिंह धोनी? जाणून घ्या सत्य
Ajay Devgn Ms Dhoni : अजय देवगन आणि महेंद्र सिंह धोनी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Suniel Shetty: 'त्याच्यापेक्षा मला जास्त त्रास होतो...'; जावयाला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांमुळे सुनील शेट्टीला होतो त्रास
Suniel Shetty And KL Rahul: मुलाखतीमध्ये सुनीलला के.एल. राहुलला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सुनीलनं या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  Read More
Movie Shooting : छोटा पॅकेट बडा धमाका; गंभीर दुखापत होऊनही शूटिंगदरम्यान 'या' बालकलाकाराने केली कमाल
Aryan Hagawane : गंभीर दुखापत होऊनही सीनदरम्यान 'खुर्ची' फेम आर्यन हगवणेने कमाल केली आहे. Read More
Sukh Mhanje Nakki Kay Asta:  पुण्याची मृण्मयी गोंधळेकर साकारतीये 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'राजमा' ही भूमिका; जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल...
Sukh Mhanje Nakki Kay Asta: नित्या आणि जयदीपसोबत राजमाचं काय नातं आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. राजमा ही भूमिका मृण्मयी गोंधळेकरनं साकारली आहे. जाणून घेऊयात मृण्मयीबद्दल... Read More
Fighter New Poster: 'फायटर'मधील अक्षय ओबेरॉयचा जबरदस्त लूक आऊट; चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका
Fighter New Poster: अक्षयनं (Akshay Oberoi) फायटर चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटामधील त्याच्या भूमिकेची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे. Read More
Ranbir Kapoor : 'अ‍ॅनिमल'नंतर रामाच्या भूमिकेत झळकणार रणबीर कपूर! 'रामायण'च्या शूटिंगला होणार सुरुवात
Ramayana Shooting Date Update : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि यशच्या आगामी 'रामायण' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. Read More
Sam Bahadur Box Office Collection Day 12: 'सॅम बहादुर'ची बॉक्स ऑफिसवर जादू; 12 व्या दिवशी केली एवढी कमाई
Sam Bahadur Box Office Collection Day 12: 'सॅम बहादुर' या चित्रपटानं रिलीजच्या 12 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केले आहे? ते जाणून घेऊया... Read More
Dunki Advance Booking : शाहरुखचा 'डंकी' मोडणार 'पठाण' अन् 'जवान'चा रेकॉर्ड! वर्षाच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर पडणार पैशांचा पाऊस
Dunki Movie : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासाठी सज्ज आहे. Read More
Upcoming Movies in 2024 : हृतिक-दीपिकाचा 'Fighter' ते अजयचा 'सिंघम 2'; नव्या वर्षात प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे
New Upcoming Movies : नव्या वर्षात अर्थात 2024 मध्ये अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. Read More
Vivek Oberoi Aishwarya Rai : ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपचं खरं कारण काय? विवेक ऑबेरॉयचा मोठा गौप्यस्फोट
Vivek Oberoi Aishwarya Rai : विवेक ओबेरॉयने नुकत्याच एका मुलाखतीत ऐश्वर्या राय बच्चनबद्दल भाष्य केलं असून त्यांच्या ब्रेकअपचा खुलासा केला आहे. Read More
Rajinikanth : रजनीकांतचा 'लाल सलाम'! 'मोईद्दीन भाई'च्या स्वॅगने चाहत्यांना लावलं वेड
Rajinikanth : रजनीकांत यांच्या आगामी 'लाल सलाम' (Lal Salaam) सिनेमातील प्रोमो आऊट झाला आहे. Read More
Mahadev App : महादेव बेटिंग अ‍ॅपचा मालक ताब्यात, दुबईत बेड्या; रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस
Mahadev App : महादेव बेटिंग अ‍ॅपचा मालकाला ताब्यात घेण्यात आलं असून रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली गेली होती. Read More
Animal Box Office Collection : रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ने पार केला 450 कोटींचा टप्पा; रिलीजच्या 12 व्या दिवशी मात्र कमाईत घसरण
Animal Movie : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या 12 व्या दिवशी 450 कोटींचा टप्पा पार केला आहे. Read More
Ravindra Berde Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ravindra Berde Death : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. बऱ्याच वर्षांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. Read More
Khushi Kapoor : 'द आर्चीज' रिलीज होताच खुशी कपूरला मिळाला दुसरा सिनेमा; 'या' स्टारकिडसोबत स्क्रीन शेअर करणार
Khushi Kapoor : 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमानंतर खुशी कपूर लवकरच एका सिनेमात झळकणार आहे. करण जोहर (Karan Johar) या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.