एक्स्प्लोर

Rajinikanth : रजनीकांतचा 'लाल सलाम'! 'मोईद्दीन भाई'च्या स्वॅगने चाहत्यांना लावलं वेड

Rajinikanth : रजनीकांत यांच्या आगामी 'लाल सलाम' (Lal Salaam) सिनेमातील प्रोमो आऊट झाला आहे.

Rajinikanth : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आगामी 'लाल सलाम' (Lal Salaam) या सिनेमाचा प्रोमो आऊट झाला आहे. 'जेलर' (Jailer) या सिनेमानंतर रजनीकांतचे चाहते 'लाल सलाम' या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमातील रजनीकांत यांचा लूक समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'मोईद्दीन भाई'च्या स्वॅगने चाहत्यांना  वेड लावलं आहे. 

रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त 'लाल सलाम'मधील त्यांचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. अंगावर शहारे आणणारा हा प्रोमो व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये रजनीकांत यांचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. अॅक्शचा तडका असणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उस्तुकता आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Lyca Productions (@lycaproductions)

'लाल सलाम' हा तामिळ भाषेतील स्पोर्ट्स ड्रामा आहे. या सिनेमात रजनीकांत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. थलायवा रजनीकांतसह या सिनेमात विष्णु विशाल, विक्रांत, विग्णेश आणि जीविता हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाचं कथानक रजनीकांत यांची लेक ऐश्वर्याने लिहिलं आहे. तसेच दिग्दर्शनाची धुराही तिनेच सांभाळली आहे.

'लाल सलाम' कधी रिलीज होणार? (Lal Salaam Release Date)

'लाल सलाम' या सिनेमाची घोषणा 2022 मध्ये झाली होती. तर मार्च 2023 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली. ऑगस्टमध्ये या सिनेमाचं शूटिंग संपलं. या सिनेमासंदर्भात ऐश्वर्या रजनीकांतने खास पोस्टदेखील लिहिली होती. 'लाल सलाम' या सिनेमासाठी ऐश्वर्याने कशी मेहनत घेतली? किती कष्ट घेतले हे तिने या पोस्टमध्ये सांगितलं होतं. 'लाल सलाम' हा सिनेमा 2024 मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा (Rajinikanth Birthday)

रजनीकांत यांनी आपला 73 वा वाढदिवस कुटुंबियांसोबत साजरा केला आहे. रजनीकांत यांना मोहनलाल, धनुष, जॅकी श्रॉफ, कलम हासन, ज्युनियर एनटीआरसह अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कुटुंबियांनी रजनीकांत यांचा 73 वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. घरातच एका छोट्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पत्नी लता, लेक ऐश्वर्या आणि सौंदर्यासह कुटुंबातील मंडळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Rajinikanth : जेजुरीचे कडे पठार ते साऊथचा थलाईव्हा, बस कडंक्टर शिवाजीराव गायकवाड सुपरस्टार रजनीकांत कसा झाला? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget